शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक साहित्याच्या किमतीत दुप्पट वाढ

By admin | Updated: September 23, 2014 00:16 IST

शहरातील प्रेस बाजारात लोकसभा निवडणुकी मुळे रात्र-दिवस प्रचार साहित्य बनविले जात असून ठाणे रायगडसह अन्य जिल्हात निवडणूक साहित्याला मागणी आहे.

सदानंद नाईक, उल्हासनगरशहरातील प्रेस बाजारात लोकसभा निवडणुकी मुळे रात्र-दिवस प्रचार साहित्य बनविले जात असून ठाणे रायगडसह अन्य जिल्हात निवडणूक साहित्याला मागणी आहे. साहित्य किंमतीत दुप्पट वाढ होऊनही मागणीत सतत वाढ होत आहे. निवडणुकीतील विविध साहित्याची निर्मित्ती येथील प्रेस बाजारात केली जात आहे. नोंदणीकृत पक्षाचे झेंडे, नावाच्या व चिन्हाच्या टोप्या, कलर हँडबिल, स्टीकर्स, अहवाल पुस्तिका, बॅचेस, मफलर, तोरण, डिजिटल बॅनर्स, पक्षाच्या नावाचे बलून आदी साहित्य तयार केले जात आहे. तसेच अपक्ष उमेदवाराचे चिन्हे, झेंडे, नावाच्या टोप्या, आदी साहित्य मागणी नुसार २४ तासाच्याआत बनवून दिले जात आहेत.ठाणे जिल्हातील ठाणे, भिंवडी, कल्याण, पालघर, रायगड, मावळ, तसेच मुंबई येथिल लोकसभा उमेदवार येथील प्रेस बाजारातून निवडणूक साहित्य खरेदी करीत असल्याची माहिती प्रेस बाजारचे पदाधिकारी शंकर नागरानी व राजु तेलकर यांनी दिली आहे. साहित्याची मागणी हजारोच्या संख्येत व नगात असल्याने कमी किंमतीत साहित्य बनवून दिले जात आहे. तसेच किरकोळ स्वरूपात साहित्य खरेदी केल्यास १५ ते २० टक्के जादा किेंमत मोजावी लागत आहे. याशिवाय सर्च इंजिन सॉफटवेअर, मोबाईल सॉफटवेअर, अल्फाबेटीकल मतदार यादी, कॉम्युटरराईज्ड, कलर वोटर स्लिप, डमी वोटींग मशीन, यादी साहित्य मागणी नुसार बनविले जात आहे. प्रेस बाजारात ठाणे, रायगड व मुंबई येथील पक्ष उमेदवार पदाधिका-यांच्या मार्फत साहित्य बनवून घेत आहेत. अपक्ष उमेदवाराच्या कार्यकर्त्याचा राबता पुढील आठवडया पासून वाढणार असून प्रेस बाजारात कोट्यवधी रूपयाची उलाढाल होत आहे.