शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मशिदीत अंदाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
2
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
3
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
4
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
6
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
7
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
8
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
9
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
10
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
11
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
12
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
13
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
14
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
15
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
16
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
17
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
18
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
19
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
20
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
Daily Top 2Weekly Top 5

"मी जनतेची माफी मागतो..."; कुंभमेळ्याच्या सांगतेनंतर, असं का म्हणाले पंतप्रधान मोदी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 15:35 IST

कुंभमेळ्याच्या सांगतेनंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, याचे वर्णन करताना, हा 'एक्याचा महायज्ञ' असल्याचे म्हटले आहे...

शिवरात्रीच्या स्नानानंतर कुभमेळ्याची सांगता झाली आहे. प्रयागराज येथे ४५ दिवस चाललेल्या या कुंभमेळ्यात देशाच्या कानाकोपऱ्यातून कोट्यधी भावीकांनी येऊन संगमावर पवित्र स्नान केले. कुंभमेळ्याच्या सांगतेनंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, याचे वर्णन करताना, हा 'एक्याचा महायज्ञ' असल्याचे म्हटले आहे. तसेच, या भव्यदिव्य आयोजनात सहभागी झाल्याबद्दल भाविकांचे आभारही मानले. याशिवाय, त्यांनी भाविकांना झालेल्या असुविधेबद्दल माफीही मागितली आहे.

पंतप्रधान मोदींनी का मागीतली माफी? -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी Narendramodi.in वर लिहिलेल्या  एका लेखात त्यांनी सर्वांची माफी मागितली आहे. त्यांनी म्हटले आहे, "मला माहीत आहे, एवढे मोठे आयोजन सोपे नव्हते. मी, माता गंगा, माता यमुना आणि माता सरस्वती यांच्याकडे प्रार्थना करतो की, आमच्या उपासनेत काही कमतरता राहिली असेल तर कृपया करून आम्हाला क्षमा करा. माझ्यासाठी जनता जनार्दन ही इश्वराचे रूप आहे. माझ्याकडून भाविकांच्या सेवेतही काही कमतरता राहिली असेल, तर मी जनतेलाही क्षमा मागतो."

कुंभमेळ्यासंदर्भात काय म्हणाले, पंतप्रधान मोदी? -
यानंतर, एका पाठोपाट एक केलेल्या ट्विटमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले, "140 कोटी देशवासियांची श्रद्धा जेव्हा एकाच वेळी एका ठिकाणी येते, तेव्हा ते दृष्य अविस्मरणीह बनते. प्रयागराजमधील कुंभमेळ्यादरम्यान आपण हेच अद्भूत दृश्य बघितले. हे आयोजन म्हणजे, केवळ एक धार्मिक उत्सवच नाही तर, आपल्या सांस्कृतीक ऐक्याचे आणि अखंडतेचे प्रतिक आहे. जेव्हा एखादे राष्ट्र शतकानुशतकांची गुलामगिरीची मानसिकता तोडून पुढे वाटचाल करते आणि मोकळा श्वास घेते, तेव्हा ज्या पद्धतीचे दृश्य दिसते, अगदी तसेच दृश्य आपण कुंभमेळ्यात बघितले."

४५ दिवस चाललेल्या या कुंभमेळ्यात ६६.३० कोटी भाविकांनी केले पवित्र स्नन - 
गेल्या १३ जानेवारीपासून सुरू झालेल्या या कुंभमेळ्याचा समारोप बुधवारी झाला. एकूण ४५ दिवस चाललेल्या या महाकुंभमेळ्यात जवळपास ६६.३० कोटी भाविकांनी गंगेच्या पात्रात आणि संगमावर स्नान केले. कुंभमेळा प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, बुधवारी रात्री ८ वाजेपर्यंत १.५३ कोटींहून अधिक भाविकांनी येते स्नान केले.

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाPrayagrajप्रयागराजNarendra Modiनरेंद्र मोदी