शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

प्रजापती यांना दिलासा नाहीच

By admin | Updated: March 7, 2017 03:56 IST

उत्तर प्रदेशचे वादग्रस्त मंत्री गायत्री प्रजापती यांना सर्वोच्च न्यायालयाकडूनही दिलासा मिळू शकला नाही.

नवी दिल्ली : बलात्काराचा आरोप असलेले आणि त्यामुळे अटक टाळत असलेले उत्तर प्रदेशचे वादग्रस्त मंत्री गायत्री प्रजापती यांना सर्वोच्च न्यायालयाकडूनही दिलासा मिळू शकला नाही. प्रजापती यांच्यावर बलात्काराचा आरोप असून, गुन्हा दाखल झाल्यापासून ते अटक टाळण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. अटक टाळण्यासाठीच त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयानेच प्रजापती यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यावर प्रजापतींनी हा राजकीय कट असल्याचा आरोप करीत एफआयआर दाखल करण्याचे आदेश मागे घेण्याची विनंती न्यायालयाला केली होती; मात्र न्यायालयाने ती अमान्य केली.एका महिलेवर बलात्कार, तिच्या मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आपण उत्तर प्रदेश पोलिसांना एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र या चौकशीचा पाठपुरावा केला जात नसल्याचे आढळून आले आहे, असे न्यायमूर्ती ए. के. सिक्री यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने स्पष्ट केले. एफआयआर दाखल करण्याच्या आदेशाला राजकीय रंग देण्यात आल्याबद्दलही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. समाजवादी पार्टीचे नेते गायत्री प्रजापती यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करून याबाबतचा कृती अहवाल बंद पाकिटात आठ आठवड्यांत न्यायालयाला सादर करावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने १७ फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेश पोलिसांना दिले होते. आपल्याविरुद्धचे आरोप खोटे असून, राज्य सरकारनेही सर्वोच्च न्यायालयासमोर योग्य बाजू मांडली नसल्याचा दावा प्रजापती यांनी केला. प्रजापती यांच्याविरुद्धची तक्रार राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे करण्यात आली होती. तरीही पोलिसांनी कारवाई केली नाही, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी केला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)>प्रजापतीच्या सहकाऱ्याला अटक लखनऊ : उत्तर प्रदेशचे फरार कॅबिनेट मंत्री व बलात्कार प्रकरणातील आरोपी गायत्री प्रसाद प्रजापती यांचे सहकारी चंद्रपाल सिंग यांना पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. प्रजापतीसह अन्य आरोपींच्या ठावठिकाण्याबाबत त्यांची चौकशी करण्यात येत आहे. प्र्रजापती यांचा पासपोर्ट जप्त करण्यात आला असून त्यांच्याविरुद्ध लुक आउट नोटीसही जारी करण्यात आली आहे. प्रजापती व अन्य सहा जणांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलेला आहे.>तक्रारदार भाजपाशी संबंधित?विरोधकांनी निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रजापती आणि त्यांच्या पक्षावर हल्ले करण्यासाठी या मुद्द्याचा वापर केला. तक्रारदार भाजपाशी संबंधित असून, राजकीय हेतूने आपल्याविरुद्ध तक्रार देण्यात आली आहे, असा आरोप करून आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना प्रजापती यांनी व्यक्त केली.