प्रज्ञा - निकिता दातेचे यश

By Admin | Updated: June 12, 2015 17:38 IST2015-06-12T17:38:05+5:302015-06-12T17:38:05+5:30

बेल्हा : आणे (ता. जुन्नर) येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळ संचलित, सरदार पटेल उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी निकिता दाते हिने मोलमजुरी करून बारावी परीक्षेत ८७.०८ टक्के गुण मिळवले. तिने पुणे जिल्‘ात वाणिज्य मराठी माध्यमामध्ये प्रथम क्रमांक मिळविला असल्याची माहिती प्राचार्य सी. आर. लोहोटे यांनी दिली.

Pragya - The success of Nikita Date | प्रज्ञा - निकिता दातेचे यश

प्रज्ञा - निकिता दातेचे यश

ल्हा : आणे (ता. जुन्नर) येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळ संचलित, सरदार पटेल उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी निकिता दाते हिने मोलमजुरी करून बारावी परीक्षेत ८७.०८ टक्के गुण मिळवले. तिने पुणे जिल्‘ात वाणिज्य मराठी माध्यमामध्ये प्रथम क्रमांक मिळविला असल्याची माहिती प्राचार्य सी. आर. लोहोटे यांनी दिली.
निकिताचे आईवडील मोलमजुरी करतात. निकिताही सु˜ीच्या काळात धुणीभांडी करून आईबरोबर मोलमजुरीस जात असे. हे काम करून तिने मिळवलेले यश कौतुकास्पद आहे. तिने दहावीच्या परीक्षेत देखील ८२.६० टक्के गुण मिळविले होते. ती शाळेसाठी दररोज ४ किलोमीटर पायपीट करते. तिला बारावीला विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याची इच्छा असूनसुध्दा घरच्या परिस्थितीमुळे जाता आले नाही. तिने शिक्षकांचे मार्गदर्शन घेऊन हे यश संपादन केले आहे.
फोटो : निकिता दाते

Web Title: Pragya - The success of Nikita Date