शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेचे वारे..भाग एक

By admin | Updated: March 8, 2015 00:31 IST

जिल्हा पंचायत निवडणुकीचा निकाल काहीही लागो पण निवडणुका झाल्यानंतरही कायतू व मिकी यांच्यातील वितुष्ट कायम राहिल. उलट दरी आणखी रुंदावेल व त्या पक्षात फुट पडू शकते, अशी स्थिती आहे. गोव्याच्या राजकारणात केवळ दोन आमदार देखील एका पक्षात चांगल्या प्रकारे राहू शकत नाही असा अनुभव अनेकदा आला आहे. दोन आमदारही एकत्र राहत नाही कारण राजकीय पक्षांसमोर ध्येयधोरण असे काही असत नाही. एखाद्या तत्त्वज्ञानाने आमदारांना बांधून ठेवले आहे असे चित्र कधी दिसत नाही. 2007 च्या निवडणुकीवेळी चर्चिल आलेमाव यांनी सेव्ह गोवा पक्ष स्थापन केला होता, तेव्हा त्या पक्षाच्या तिकीटावर चर्चिल हे नावेलीतून तर आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स हे कुडतरी मतदारसंघातून निवडून आले. नंतर काही महिन्यांनी रेजिनाल्ड व चर्चिल हे एकमेकांचे शत्रू बनले. तत्पूर्वीच्या काळात म्हणजे 2003-04 साली सुदिन ढवळ

जिल्हा पंचायत निवडणुकीचा निकाल काहीही लागो पण निवडणुका झाल्यानंतरही कायतू व मिकी यांच्यातील वितुष्ट कायम राहिल. उलट दरी आणखी रुंदावेल व त्या पक्षात फुट पडू शकते, अशी स्थिती आहे. गोव्याच्या राजकारणात केवळ दोन आमदार देखील एका पक्षात चांगल्या प्रकारे राहू शकत नाही असा अनुभव अनेकदा आला आहे. दोन आमदारही एकत्र राहत नाही कारण राजकीय पक्षांसमोर ध्येयधोरण असे काही असत नाही. एखाद्या तत्त्वज्ञानाने आमदारांना बांधून ठेवले आहे असे चित्र कधी दिसत नाही. 2007 च्या निवडणुकीवेळी चर्चिल आलेमाव यांनी सेव्ह गोवा पक्ष स्थापन केला होता, तेव्हा त्या पक्षाच्या तिकीटावर चर्चिल हे नावेलीतून तर आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स हे कुडतरी मतदारसंघातून निवडून आले. नंतर काही महिन्यांनी रेजिनाल्ड व चर्चिल हे एकमेकांचे शत्रू बनले. तत्पूर्वीच्या काळात म्हणजे 2003-04 साली सुदिन ढवळीकर व पांडुरंग मडकईकर हे दोघे म.गो. पक्षाचे आमदार होते पण मडकईकर यांनी मंत्री ढवळीकर यांना त्यावेळी रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याच काळात बाबूश मोन्सेरात, मिकी पाशेको व स्वर्गीय माथानी साल्ढाणा हे युगोडेपाचे आमदार होते. त्यावेळी बाबूशने युगोडेपास रामराम ठोकत भाजपचे घर गाठले होते. डॉ. विली डिसोझा हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व उपमुख्यमंत्री होते तेव्हा मिकी पाशेको हे राष्ट्रवादीचे आमदार होते. त्यावेळीही डिसोझा व पाशेको यांच्यात खूप वाद रंगायचे. जिथे दोन-तीन आमदारही जास्त काळ एकत्र राहू शकत नाही तिथे मोठय़ा पक्षांबाबत व आठ-दहा आमदारांच्या गटाबाबत काय
बोलावे?
पाशेको यांना जिल्हा पंचायत निवडणुकीवेळी भाजपने आपल्यासोबत ठेवले. कारण ते सध्याही भाजपसोबत सत्तेत आहेत म्हणून नव्हे. जिल्हा पंचायत निवडणुकीवेळी सासष्टीत काँग्रेसच्या आमदारांचे किती उमेदवार निवडून येतात व गोवा विकास पक्षाचे किती उमेदवार बाजी मारतात ते भाजपला पहायचे आहे. पाशेको यांची म्हणजेच त्यांच्या गोवा विकास पक्षाची शक्ती जर वाढली तर ते भाजपसाठी उपयुक्त ठरेल. कारण काँग्रेसची तेवढी जास्त हानी होईल. भाजपला सासष्टीत मते मिळत नाहीत. सासष्टी हा आपला बालेकिल्ला आहे असे काँग्रेस पक्ष मानतो. 2012च्या निवडणुकीवेळी त्यास पहिल्यांदा भाजपने सुरूंग लावला.