शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

दुपारचं जेवण केल्यानंतर अचानक बिघडली पोलिसांची तब्येत, ६० जणांना केलं रुग्णालयात दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 18:44 IST

Bihar Food Poisoning: बिहारमधील बांका जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील पोलीस लाईनमध्ये दुपारचं जेवण केल्यानंतर अचानक अनेक पोलीस कर्मचाऱ्यांची प्रकृती बिघडली. तसेच सुमारे ६० जणांना उलट्या, चक्कर, पोटदुखी असा त्रास सुरू झाला.

बिहारमधील बांका जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील पोलीस लाईनमध्ये दुपारचं जेवण केल्यानंतर अचानक अनेक पोलीस कर्मचाऱ्यांची प्रकृती बिघडली. तसेच सुमारे ६० जणांना उलट्या, चक्कर, पोटदुखी असा त्रास सुरू झाला. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून खबरदारीचा उपाय म्हणून आजारी पोलीस कर्मचाऱ्यांना तातडीने बांका येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिथे या जवानांवर उपचार सुरू आहेत. तसेच या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा प्रशासनानही सक्रिय झालं असून, जिल्हाधिकारी नवदीप शुक्ला यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेत आजारी जवानांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

रुग्णालयामध्ये सिव्हिल सर्जनच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांचं पथक सर्व पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचार करत आहे. सद्यस्थितीत सर्व पोलीस कर्मचाऱ्यांची प्रकृती स्थिर आहे. तसेच चिंतेची कुठलीही बाब नसल्याचे सांगण्यात येत आहे.

या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस लाईनमध्ये असलेल्या कँटिंनमध्ये जेवणात भात आणि छोले घेतले होते. भोजन केल्यानंतर काही वेळातच त्यांना उलट्या आणि चक्कर येऊ लागली. सुरुवातीला याकडे सामान्य बाब म्हणून दुर्लक्ष केलं गेलं. मात्र नंतर त्रास वाढल्याने या पोलीस कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.  त्यांच्यावर उपचार सुरू असून, प्राथमिक लक्षणांमधून या पोलिसांना अन्नविषबाधा झाली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Bihar: Police fall ill after lunch, 60 hospitalized immediately.

Web Summary : In Bihar's Banka, 60 police officers fell ill after lunch, experiencing vomiting and dizziness. They were hospitalized and are stable. Food poisoning suspected.
टॅग्स :BiharबिहारPoliceपोलिसfood poisoningअन्नातून विषबाधा