शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

केस कापले, शरीरावर चटके देत 33 वेळा वार केला अन्...; भयंकर घटनेमागचं धक्कादायक कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 17:07 IST

मन सुन्न करणारी घटना. दिव्याच्या हत्येमागचं भयंकर कारण समोर आलं आहे.

देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. याच दरम्यान अंगावर काटा आणणारी एक भयंकर घटना घडली आहे. आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणममध्ये एका 22 वर्षीय मुलीची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. दिव्या असं हत्या करण्यात आलेल्या मुलीचं नाव असून याप्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. दिव्याच्या हत्येमागचं भयंकर कारण समोर आलं आहे. तिचं सौंदर्यच तिच्या मृत्यूचं कारण ठरलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, दिव्या विशाखापट्टणममध्ये एका भाड्याच्या घरात राहत होती. घर मालकिणीने वेश्या व्यवसायासाठी तिचा छळ केला. तसेच केस आणि भुवया कापल्या, शरीरावर चटके देत 33 वेळा वार केला,  तिला उपाशी ठेवलं. यामुळे दिव्याचा मृत्यू झाला. दिव्याचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र आरोपींचा हा प्रयत्न फसला. पोलिसांनी याप्रकरणी कसून तपासणी केली असता दिव्या सुंदर असल्याने वेश्या व्यवसायात ढकल्याचा आरोपींचा प्लॅन असल्याची माहिती मिळाली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिव्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या घर मालकिणीला अटक करण्यात आली आहे. दिव्याला वेश्या व्यवसायात ढकलण्यासाठी अत्याचार केले आणि छळ करून तिची हत्या केली होती. पोलिसांना 22 वर्षीय मुलीचा संशयास्पद स्थितीत मृतदेह सापडला. जेव्हा आरोपी मृतदेहाची विल्हेवाट लावत होते तेव्हा पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. अधिक चौकशी केली असता दिव्याचा आजारपणामुळे मृत्यू झाल्याचं कारण सुरुवातीला सांगण्यात आलं. 

दिव्याच्या मृतदेहाचं शवविच्छेदन केलं असता तिच्या शरीरावर 33 जखमा असल्याचं आढळून आलं. आरोपी महिला आणि तिच्या सहकाऱ्यांनी दिव्याचा मृतदेह फुलांनी झाकला होता. मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घेऊन जात असताना वाहन चालकाला संशय आला आणि त्याने पोलिसांना याबाबत माहिती दिली. घर मालकीण दिव्याला वेश्या व्यवसाय करण्यासाठी भाग पाडत होती. तसेच ती सुंदर असल्याचाही राग तिच्या मनात होता. यावरूनच तिचा क्रूरपणे छळ करण्यात आल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपींना अटक केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

महत्त्वाच्या बातम्या

"फक्त बोलणारे आणि काहीही काम न करणारे चॅम्पियन परतले"

स्थलांतरीत मजुरांना 15 दिवसांत घरी पाठवा, त्यांच्यावरील गुन्हे रद्द करा; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

CoronaVirus News : 'कोरोनामुळे जगभरातील परिस्थिती आणखी बिघडतेय'; WHO ने दिला गंभीर इशारा

CoronaVirus News : NDRFमध्ये कोरोनाचा 'विस्फोट'; पश्चिम बंगालमध्ये 'अम्फान' दरम्यान तैनात 50 जवान पॉझिटिव्ह

CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात देशवासियांना मोठा दिलासा! 'ही' आकडेवारी पाहून म्हणाल अरे व्वा!

CoronaVirus News : लक्षणं नसलेल्या रुग्णांकडून कोरोना पसरतो का?; WHO ने दिली महत्त्वाची माहिती

Today's Fuel Price: इंधन दरवाढ सुरू! सर्वसामान्यांच्या खिशावर दरवाढीचा भार; पेट्रोल 80 पार

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशCrime Newsगुन्हेगारीMurderखूनDeathमृत्यूPoliceपोलिस