CoronaVirus News : NDRFमध्ये कोरोनाचा 'विस्फोट'; पश्चिम बंगालमध्ये 'अम्फान' दरम्यान तैनात 50 जवान पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 11:58 AM2020-06-09T11:58:27+5:302020-06-09T12:07:49+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये अम्फान चक्रीवादळाचा कहर पाहायला मिळाला आहे. या चक्रीवादळामुळे मोठं नुकसान झालं आहे.

CoronaVirus News: Corona 'explodes' in NDRF; 50 jawans deployed during 'Amphan' in West Bengal positive | CoronaVirus News : NDRFमध्ये कोरोनाचा 'विस्फोट'; पश्चिम बंगालमध्ये 'अम्फान' दरम्यान तैनात 50 जवान पॉझिटिव्ह

CoronaVirus News : NDRFमध्ये कोरोनाचा 'विस्फोट'; पश्चिम बंगालमध्ये 'अम्फान' दरम्यान तैनात 50 जवान पॉझिटिव्ह

Next

नवी दिल्ली - कोरोना रुग्णसंख्येच्या यादीत भारत आता सहाव्या क्रमांकावर आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाय केले जात आहेत. देशातील एकूण रुग्णसंख्या 2 लाख 50 हजारांहून अधिक झाली आहे. भारतात लॉकडाऊन उठण्यास सुरुवात झालेली असतानाच देशभरात कोरोनाचे हजारांवर 9 हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. वेगाने पसरणाऱ्या कोरोनाने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. याच दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये अम्फान चक्रीवादळाचा कहर पाहायला मिळाला आहे. या चक्रीवादळामुळे मोठं नुकसान झालं आहे. पश्चिम बंगाल आलेल्या अम्फान चक्रीवादळादरम्यान मदतकार्यासाठी एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आली होती. तैनात करण्यात आलेल्या जवानांपैकी तब्बल 50 जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. जवानांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. 

एनडीआरएफचे महासंचालक सत्य नारायण प्रधान यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे. 'अम्फान चक्रीवादळादरम्यान मदत कार्यावरून परतलेल्या ओडिशाच्या 190 एनडीआरएफच्या जवानांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी 50 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मात्र त्यांच्यात कोणतीही लक्षणं दिसून आली नव्हती. कोरोनाची लागण झालेल्या जवानांना देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे' असं ट्विट सत्य नारायण प्रधान यांनी केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अम्फान चक्रीवादळाच्या मदत कार्याहून एनडीआरएफचे जवान परतले. त्यातील एका जवानामध्ये कोरोनाची काही लक्षणं आढळून आली. तेव्हा त्याची चाचणी केली असता त्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर इतरही जवानांची कोरोना चाचणी केली असता त्यापैकी 50 जवान कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं आहे. एनडीआरएफच्या 177 जवानांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात देशवासियांना मोठा दिलासा! 'ही' आकडेवारी पाहून म्हणाल अरे व्वा!

CoronaVirus News : लक्षणं नसलेल्या रुग्णांकडून कोरोना पसरतो का?; WHO ने दिली महत्त्वाची माहिती

बापरे! दोन महिन्यांत तब्बल 14 धक्के; दिल्लीत मोठ्या भूकंपाचे संकेत?

'इम्रान खानपेक्षा आदित्यनाथांचं नेतृत्व चांगलं'; पाकिस्तानात योगींचं भरभरून कौतुक

...म्हणून चीनी मालावर बहिष्काराचा 'सर्जिकल स्ट्राईक' हवाच"

 

Web Title: CoronaVirus News: Corona 'explodes' in NDRF; 50 jawans deployed during 'Amphan' in West Bengal positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.