शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
2
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
3
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
4
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
5
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
6
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
7
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
8
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
9
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
10
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
11
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
12
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
13
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
14
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
17
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
18
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
19
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या नसांमध्ये रक्त नाही, गरम सिंदूर...आता फक्त PoK..; पीएम मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 14:22 IST

PM Narendra Modi on Pakistan : 'दहशतवादाचा पोशिंदा पाकिस्तानचा खरा चेहरा संपूर्ण जगाला दाखवला जाईल.'

PM Narendra Modi on Pakistan : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील बिकानेरमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना ते म्हणाले की, 22 एप्रिल रोजी आपल्या माता बहिणींचा धर्म विचारुन त्यांचा सिंदूर हिसकावण्यात आला. त्या घटनेनंतर 140 कोटी देशवासीयांनी दहशतवाद मुळापासून उखडून टाकण्याचा संकल्प केला होता. आमच्या सरकारने तिन्ही दलांना पूर्ण स्वातंत्र्य दिले अन् सैन्यांनी मिळून पाकिस्तानला शरणागती पत्करण्यास भाग पाडले. माझ्या नसांमध्ये रक्त नाही तर गरम सिंदूर वाहत आहे. आता पाकिस्तानसोबत ना व्यापार होणार, ना चर्चा. प्रत्येक दहशतवादी हल्ल्याची किंमत त्याला चुकवावी लागेल, असेही मोदी म्हणाले. 

22 एप्रिलच्या हल्ल्याला 22 मिनिटांत उत्तर पंतप्रधान मोदी पुढे म्हणतात, 22 तारखेला झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने 22 मिनिटांत दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. जेव्हा सिंदूरचे स्फोटके होतात, तेव्हा काय होते ते सर्वांनी पाहिले. मी माझ्या देशवासियांना सांगू इच्छितो की, जे लोक सिंदूर पुसण्यासाठी बाहेर पडले होते, ते धुळीत मिसळले गेले आहेत. भारतात सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेण्यात आला आहे, असेही ते म्हणाले. 

अणुबॉम्बची धमकी...पाकिस्तानला इशारा देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, दहशतवादाचा पोशिंदा पाकिस्तानचा खरा चेहरा संपूर्ण जगाला दाखवला जाईल. पाकिस्तान कधीही भारताविरुद्ध थेट युद्ध जिंकू शकत नाही. जेव्हा जेव्हा लढायला आला, त्याला नेहमीच पराभवाचा सामना करावा लागला. आता पाकस्तानची अणुबॉम्बची धमकीही काम करणार नाही. पाकिस्तानला भारताचा हक्काचा पाणी वाटाही मिळणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाNarendra Modiनरेंद्र मोदीPakistanपाकिस्तान