PM Modi US Visit : देशाची करोडोंची संपत्ती! 'स्पेशल 157' गिफ्ट घेऊन मोदी मायदेशी निघाले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 08:39 AM2021-09-26T08:39:01+5:302021-09-26T08:45:40+5:30

PM Modi US Visit: अनेक उद्योगपतींनी भारतात गुंतवणूक करण्यास तयारी दर्शविली. मोदींनी त्यांना भारतात उत्पादन प्रकल्प उभे करण्यास सांगितले. तसेच जर अमेरिकी कंपन्या भारतात आल्या तर केवल अर्थव्यवस्थेलाच नाही तर देशातही रोजगार उपलब्ध होतील असे मोदींनी सांगितले. 

PM Narendra Modi to bring home 157 artefacts, antiquities handed over by America | PM Modi US Visit : देशाची करोडोंची संपत्ती! 'स्पेशल 157' गिफ्ट घेऊन मोदी मायदेशी निघाले

PM Modi US Visit : देशाची करोडोंची संपत्ती! 'स्पेशल 157' गिफ्ट घेऊन मोदी मायदेशी निघाले

googlenewsNext

न्यूयॉर्क : अमेरिकेतील तीन दिवसांचा दौरा संपवून नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे मायदेशी रवाना झाला आहेत. या दौऱ्यात त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला संबोधित केले. या दौऱ्यात मोदींनी मोठमोठे उद्योजक, राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांची भेट घेतली. त्या आधी मोदींनी क्वाडच्या शिखर परिषदेतही सहभाग घेतला होता. (PM Modi concludes 3-day visit, to bring back 157 artefacts US handed over)

मोदींचा हा अमेरिका दौऱा भारतीय सैन्य दलाला मोठे बळ देणार आहे. अमेरिकेचे खतरनाक हवाई ड्रोन भारत विकत घेणार आहे. याचरोबर हा दौरा आणखी एका गोष्टीसाठी महत्वाचा ठरला आहे. अमेरिकेने भारताला 157 वस्तू गिफ्ट केल्या आहेत. या वस्तू म्हणजे भारताच्याच आहेत, परंतू तस्करी करण्यात आल्या होत्या. प्राचीन ठेवा असलेल्या 157 कलाकृती आणि अँटीक वस्तू अमेरिकेने भारताकडे सुपूर्द केल्या आहेत. 

अनेक उद्योगपतींनी भारतात गुंतवणूक करण्यास तयारी दर्शविली. मोदींनी त्यांना भारतात उत्पादन प्रकल्प उभे करण्यास सांगितले. तसेच जर अमेरिकी कंपन्या भारतात आल्या तर केवल अर्थव्यवस्थेलाच नाही तर देशातही रोजगार उपलब्ध होतील असे मोदींनी सांगितले. 

काय काय आहे त्या स्पेशल गिफ्टमध्ये..
या पुरातन कलाकृती आहेत. या चोरीच्या मार्गाने अमेरिकेत आणण्यात आल्या होत्या. यापैकी 71 सांस्कृतक, हिंदू धर्माच्या 60, बौद्ध धर्माच्या 16 आणि जैन धर्माच्या 9 मूर्ती आहेत. यामध्ये 10 व्या शतकातील बलुआ दगडामध्ये कोरलेली मूर्ती, 12 व्या शतकातील 8.5 सेमी उंच कांस्यची नटराज मूर्ती आहे. 

७५ टक्के कलाकृती माेदी सरकारच्या काळात परत
यापूर्वीही ३६ कलाकृती अमेरिकेने भारताला परत केल्या हाेत्या, तर ऑस्ट्रेलियानेही १४ कलाकृती भारताच्या स्वाधीन केल्या हाेत्या. १९७६ पासून ५४ कलाकृती परत केल्या आहेत. त्यापैकी ७५ टक्के वस्तू माेदी सरकारच्या काळात परत मिळाल्या आहेत. लक्ष्मी नारायण, बुद्ध, विष्णू, शिवपार्वती, २४ जैन तीर्थंकर, आदींच्या प्राचीन मूर्ती अमेरिकेने भारताकडे साेपविल्या आहेत.

Web Title: PM Narendra Modi to bring home 157 artefacts, antiquities handed over by America

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.