शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 मे रोजी अयोध्या दौऱ्यावर, रामललांचं दंर्शन, हनुमानगढी मंदिरात आरती अन्...; असा असेल संपूर्ण कार्यक्रम!
2
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
3
KL Rahul च्या नेतृत्वासमोर मुंबई इंडियन्स ढेपाळले; रोहित ४, तर हार्दिक गोल्डन डकवर आऊट 
4
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
5
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
6
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
7
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
8
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
9
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
10
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
11
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
12
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
13
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
14
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
15
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
16
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
17
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
18
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
19
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
20
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली

देशाला लाज आणली; महिला सुरक्षेवरुन राहुल गांधींचा मोदींवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2018 6:03 PM

महिलांवर अत्याचार होत असताना मोदी व्यायामात मग्न असल्याची टीका

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणीबाणीवरुन काँग्रेसवर हल्ले चढवत असताना आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी महिलांच्या सुरक्षेवरुन मोदींवर तोफ डागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या अंगणात व्यायाम करण्यात मग्न आहेत आणि महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत देशाची अवस्था अफगाणिस्तान, सीरिया आणि सौदी अरेबियापेक्षा वाईट झाली आहे, असं ट्विट करत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. महिला सुरक्षेच्याबाबत भारताची स्थिती जगात सर्वात वाईट असल्याचं थॉमसन रॉयटर्सच्या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. याच सर्वेक्षण अहवालावरुन राहुल गांधींनी मोदींना लक्ष्य केलं. 'आमचे पंतप्रधान त्यांच्या अंगणात पायांच्या बोटांवर उभे राहतात. मात्र ते महिला सुरक्षेचा विषय टाळतात. बलात्कार आणि महिलांच्या सुरक्षेबाबत भारताची अवस्था अफगाणिस्तान, सीरिया आणि सौदी अरेबिया यांच्यापेक्षाही वाईट आहे. यामुळे देशाला लाज आणली आहे,' असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

राहुल यांनी ट्विटसोबतच एक वृत्तदेखील शेयर केलं आहे. लैंगिक हिंसाचार, गुलामी यांच्याबाबतीत भारताची स्थिती चिंताजनक असल्याचं वृत्त राहुल यांनी शेयर केलं आहे. थॉमसन रॉयटर्स फाऊंडेशननं मंगळवारी महिला सुरक्षेबद्दलचा अहवाल प्रसिद्ध केला. 550 तज्ज्ञांनी हा अहवाल तयार केला आहे. घरगुती हिंसाचार, जबरदस्तीनं केले जाणारे विवाह यासारख्या बाबतीत भारतातील महिलांची स्थिती चिंताजनक असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसTwitterट्विटर