शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
4
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
5
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
6
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
7
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
8
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
9
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
10
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
11
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
12
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
13
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
14
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
15
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
16
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
17
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
18
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
19
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
20
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी

बापरे! 'ती' निघाली 'तो' अन् बसला तब्बल 91 हजारांचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 12:35 PM

एका व्यक्तीला तब्बल 91 हजारांचा फटका बसला आहे.

हैदराबाद - जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी भारतातसह अनेक देशांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करत असून खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत. लॉकडाऊनमध्ये घरबसल्या सोशल मीडियाचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जात आहे. मात्र याच दरम्यान सोशल मीडियावर मैत्री करणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. तब्बल 91 हजारांचा फटका बसला आहे.

तरुणी असल्याचं सांगून एका तरुणाला 91 हजारांना फसवण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका फार्मा कंपनीच्या कर्मचाऱ्याची महिला असल्याचं भासवून एका भामट्याने फसवणूक केली आहे. हैदराबादमध्ये ही घटना घडली. एप्रिलमध्ये तरुणाची फेसबुकवर फसवणूक करणाऱ्या व्यक्तीशी ओळख झाली. फसवणूक करणाऱ्याने तरुणाला स्वत: फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती आणि आपण महिला असून एक कलाकार असल्याचं सांगितलं. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

लॉकडाऊनमध्ये लोकांना घरीचं राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे. मात्र तरीही फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने आपण माझ्या नवीन घरी भेटू आणि तिथे एकत्र वेळ घालवू असं तरुणाला सांगितलं. तसेच तरुणाकडे पैशांची मागणी केली. फेसबुकवर मैत्री झाल्याने तरुणही फसवणूक करणाऱ्यांच्या जाळ्यात अडकला. त्याने 15 एप्रिल रोजी पेटीएमद्वारे 91 हजार रुपये ट्रान्सफर केले. मात्र हे पैसे मिळाल्यानंतर समोरील व्यक्ती तरुणाच्या मेसेजना उत्तर देणं टाळू लागली. त्यामुळेच आपली फसवणूक झाल्याचं तरुणाच्या लक्षात आलं आणि त्याने याप्रकरणी तक्रार केली. सायबर गुन्हे विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे.

काही दिवसांपूर्वी फेसबुकवर गेल्या आठ वर्षांपासून मुलगा असून मुलगी असल्याचे भासवणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली होती. छत्तीसगडमधील रायपूरमध्ये राहणारा 31 वर्षीय रवी पुजारी, गेल्या आठ वर्षांपासून फेसबुकवर निशा जिंदल नावाने वावरत होता. लोकांना सत्य घटना कळावी म्हणून पोलिस कोठडीत आणताच त्याला पोलिसांनी, मी पोलिस कोठडीत आहे. मीच निशा जिंदल आहे, अशाप्रकारची पोस्टही करायला सांगितली. 

महत्त्वाच्या बातम्या 

Coronavirus : ...म्हणून 'या' दाम्पत्याने आपल्या मुलाचं नाव ठेवलं 'लॉकडाऊन' 

Coronavirus : जीवनावश्यक वस्तूंची होम डिलिव्हरी, 'या' सरकारची नवी हेल्पलाईन सेवा लय भारी

Coronavirus : देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला, रुग्णांची संख्या 19,984 वर, 640 जणांचा मृत्यू

Jammu And Kashmir : शोपियान चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिसIndiaभारतFacebookफेसबुक