पेठ सरपंचपदी सुरेखा पडवळ बिनविरोध

By Admin | Updated: August 26, 2015 23:32 IST2015-08-26T23:32:32+5:302015-08-26T23:32:32+5:30

पेठ : सातगाव पठार भागात सर्वांत मोठ्या समजल्या जाणार्‍या पेठ (ता. आंबेगाव) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुरेखा साहेबराव पडवळ यांची बिनविरोध निवड झाली. उपसरपंचपदी सलग दुसर्‍यांदा संतोष बबनराव धुमाळ निवडून आले असून, त्यांना ७ मते मिळाली.

Peth sarpanchapadhi Surekha Padwal is unconstitutional | पेठ सरपंचपदी सुरेखा पडवळ बिनविरोध

पेठ सरपंचपदी सुरेखा पडवळ बिनविरोध

ठ : सातगाव पठार भागात सर्वांत मोठ्या समजल्या जाणार्‍या पेठ (ता. आंबेगाव) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुरेखा साहेबराव पडवळ यांची बिनविरोध निवड झाली. उपसरपंचपदी सलग दुसर्‍यांदा संतोष बबनराव धुमाळ निवडून आले असून, त्यांना ७ मते मिळाली.
पेठ ग्रामपंचायतीचे सरपंचपद इतर मागासवर्गीय महिलेसाठी राखीव होते. सुरेखा साहेबराव पडवळ यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी जाहीर केले. उपसरपंचपदासाठी संतोष बबनराव धुमाळ व बाळासाहेब ऊर्फ हरिचंद्र रागमहाले यांच्यात लढत झाली. संतोष धुमाळ यांना ७ मते मिळाली. बाळासाहेब ऊर्फ हरिचंद्र रागमहाले यांना ६ मते मिळाली. एका मताने संतोष धुमाळ विजयी झाली. या वेळी ग्रामपंचायत सदस्य रघुनाथ तोडकर, अनिल सणस, साधना धुमाळ, रोहिणी रासकर, नीलेश क्षीरसागर, अनिता कंधारे, अशोक राक्षे, मीना कंधारे, सविता माठे, मालती राऊत उपस्थित होते.

Web Title: Peth sarpanchapadhi Surekha Padwal is unconstitutional