शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
2
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
3
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
4
आदिल खानने राखी सावंतच्या आजाराला म्हटलं 'ढोंग'; कॅन्सर, हार्ट प्रॉब्लेमची केली पोलखोल
5
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
6
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
7
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
8
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
9
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
10
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
11
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
12
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
13
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
14
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
15
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
16
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
17
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
18
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
19
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
20
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला

'लोक कोरोनाला कंटाळले; आम्ही 10 कोटी डोस फेकून दिले', अदार पूनावाला यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 2:05 PM

Covishield Doses Dumped: लोकांनी बूस्टर डोस घेतला नाही, त्यामुळे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला 10 कोटी डोस फेकून द्यावे लागले.

Corona Vaccine: 2020 आणि 2021 हे दोन वर्ष भारतासह जगभरातील लोकांवर मोठे संकट घेऊन आले होते. कोरोनामुळे जगभरात हाहाकार माजला होता. पण, 2022च्या पासून कोरोना कमी-कमी होत गेला. आता अशी परिस्थिती झालीये की, लोक कोरोनाला घाबरत नाहीत. यामुळेच सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) ने गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच कोविशील्ड लसीचे उत्पादन थांबवले होते.

10 कोटी डोस फेकून दिलेसीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मालक आणि सीईओ आदर पूनावाला म्हणाले की, कोरोनाची लाट संपली अन् नागरिकांमध्ये कोरोना लसीकरणाबाबत तसेच बूस्टर डोसबाबत उदासीनता आहे. आम्ही डिसेंबर 2021 मध्ये कोविशिल्ड कोरोना प्रतिबंधक लसीचे उत्पादन थांबवले. तरीही कोविशिल्ड लसीचे 10 कोटी डोस कालबाह्य झाल्याने वाया गेले, अशी अदर पूनावाला यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. 

कोरोना प्रतिबंधक लसीपेक्षा फ्लू लसीकरणाविषयी अधिक उदासीनता आहे. दरवर्षी किंवा दर दोन वर्षांनी कोरोना आणि फ्लूची लस नियमितपणे घ्यावी लागेल. तसेच कोव्हॅक्सिनचा वापर बूस्टर म्हणून करण्यास 10-15 दिवसांत मान्यता मिळण्याची शक्यता आहे, असेही पूनावाला यांनी सांगितले.

'यूएस फर्म Codagenix सोबत काम करत आहे'ओमायक्रॉन व्हेरिएंटविरोधात लस विकसित करण्याच्या सीरमच्या प्रयत्नांवर पूनावाला म्हणाले की, कंपनी यासाठी अमेरिकेच्या नोव्हावॅक्सशी भागीदारी करत आहे. आमची कोवोव्हॅक्स लसीची चाचणी केली गेली आहे. येत्या 10-15 दिवसांत बुस्टर शॉटला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. सीरम सध्या अमेरिकन फर्म कोडाजेनिक्ससोबत सिंगल-डोज इंट्रानेसल कोविड लसीवर काम करत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

'कोरोनाशी लढण्यासाठी रणनीती आखणे आवश्यक'डब्ल्यूएचओच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या की, एक्सबीबी, ओमायक्रॉनच्या उपप्रकारांमुळे आणखी एका लाटेचा सामना करावा लागू शकतो. आतापर्यंत कोणत्याही देशाकडून नवीन उपप्रकाराची माहिती मिळालेली नाही. या प्रकारांमुळे गांभीर्य निर्माण होऊ शकते. त्यामुळे अगोदरच कोरोनाशी लढण्यासाठी रणनीती बनवणे आवश्यक आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसAdar Poonawallaअदर पूनावाला