शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट फोनद्वारे झटपट करा रक्कम अदा

By admin | Updated: October 13, 2016 05:14 IST

भारतात कोणालाही रक्कम अदा करण्यासाठी आता रोखीचे व्यवहार, धनादेश, बँक ड्राफ्टस इत्यादी विनिमय साधनांचा वापर करण्याची आवश्यकता भासणार नाही

सुरेश भटेवरा / नवी दिल्ली भारतात कोणालाही रक्कम अदा करण्यासाठी आता रोखीचे व्यवहार, धनादेश, बँक ड्राफ्टस इत्यादी विनिमय साधनांचा वापर करण्याची आवश्यकता भासणार नाही. लवकरच त्यांची जागा यूपीआय (युनिफाइड पेमेंट इंटरफेस) ही नवी विनिमय पद्धत घेणार आहे. यूपीआय ही आपल्या बँक खात्यातून दुसऱ्याच्या बँक खात्यात रक्कम अदा करण्याची अशी पेमेंट सेवा आहे की, ज्याच्या खात्यात रक्कम अदा करायची आहे, त्याच्या बँक खात्याचा क्रमांक देण्याची गरज नाही. आपल्या स्मार्ट फोनद्वारे त्याच्या कोणत्याही बँकेच्या खात्यात त्याचा व्हर्च्युअल अ‍ॅड्रेस, ई-मेल अथवा बँकेत रजिस्टर केलेला त्याचा मोबाइल क्रमांक दिल्यास रक्कम जमा करता येईल. यूपीआयमुळे कोणालाही रक्कम अदा करणे यापुढे अधिक सोपे होणार आहे. भारतात यंदा आॅगस्ट महिन्यात ही सेवा सुरू झाली. आता यूपीआय (युनिफाइड पेमेंट इंटरफेस) सेवेला नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनने अधिक गती देण्याची तयारी चालवली असून, मार्च २0१७ पर्यंत देशातल्या किमान ५0 बँका यूपीआय सेवा सुरू करणार आहेत. यूपीआय हा आर्थिक विनिमयाचा असा आधुनिक प्रयोग आहे, जो पेमेंट रीसिट तत्त्वावर काम करतो. आपल्या स्मार्ट फोनद्वारे या माध्यमाचा वापर करून कोणालाही रक्कम अदा करता येईल अथवा मिळवता येईल. या सेवेचा लाभ घेणारा ग्राहक ज्याला रक्कम अदा करायची आहे त्याच्या व्हर्च्युअल अ‍ॅड्रेसच्या नावाऐवजी त्याच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबर अथवा ई मेलचा वापर करू शकेल. उदाहणार्थ 1234567890@२ु्र या व्हर्चुअल अ‍ॅड्रेसवर पैसे पाठवणे अथवा पैसे मिळवणे या क्रियेसाठी हा पत्ता पेमेंट आयडेंटिफायर म्हणून काम करील. स्मार्ट फोनच्या केवळ दोन सिंगल क्लिकवर फॅक्टर आॅथेंटिकेशनद्वारे रक्कम अदा करण्याची अथवा रक्कम मिळवण्याची क्रिया यूपीआय माध्यमातून पूर्ण होईल. यूपीएतून एकाच वेळी अनेक बँकांचे अकाउंट्स हँडल करता येतील. पेमेंट करण्यासाठी समोरच्या व्यक्तीच्या खाते क्रमांकाची आवश्यकता नाही, तर त्याचा रजिस्टर मोबाइल नंबर अथवा बँकेच्या व्यवहाराशी संलग्न त्याचा ई-मेल पत्ता यापैकी कोणतीही एक माहिती त्याच्या खात्यात पैसे लगेच म्हणजे रीअल टाइममधे वर्ग करण्यास पुरेशी ठरेल. २४ तास ही सेवा उपलब्ध राहणार असल्याने बँकांच्या सुट्ट्यांचा आर्थिक व्यवहाराशी संबंध राहणार नाही.