पठाणकोट हल्ला - भारतीय जवानांची अभिमानास्पद कामगिरी - नरेंद्र मोदी

By Admin | Updated: January 9, 2016 17:30 IST2016-01-09T17:22:44+5:302016-01-09T17:30:27+5:30

पठाणकोटमधल्या हवाई दलाच्या तळावरील दहशतवादी हल्ल्याला ज्या प्रकारे लष्कराने हाताळले ते कौतुकास्पद असल्याची पावती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे.

Pathankot attack - Indian soldiers proud performance - Narendra Modi | पठाणकोट हल्ला - भारतीय जवानांची अभिमानास्पद कामगिरी - नरेंद्र मोदी

पठाणकोट हल्ला - भारतीय जवानांची अभिमानास्पद कामगिरी - नरेंद्र मोदी

ऑनलाइन लोकमत
पठाणकोट (पंजाब) दि. ९ - पठाणकोटमधल्या हवाई दलाच्या तळावरील दहशतवादी हल्ल्याला ज्या प्रकारे लष्कराने हाताळले ते कौतुकास्पद असल्याची पावती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे. पुरुष व स्त्रिया अशा सगळ्या जवानांनी प्रचंड शौर्य दाखवल्याचेही मोदींनी ट्विट केले आहे.
आज शनिवारी मोदींनी पठाणकोटला भेट दिली. अत्यंत गंभीर अशा दहशतवादी हल्ल्याला भारतीय जवानांनी कसे तोंड दिले याची सविस्तर माहिती मला देण्यात आल्याचे मोदींनी म्हटले आहे. निर्णयक्षमता आणि अमलबजावणी या दोन्ही पातळ्यांवर भारतीय लष्कराच्या सगळ्या यंत्रणांनी चोख काम केल्याचे मोदी यांनी नमूद केले आहे.

Web Title: Pathankot attack - Indian soldiers proud performance - Narendra Modi