शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल संकटातून दिलासा मिळणार? अमेरिकेने रशियन तेलावरील सूट वाढवली; भारताला कसा होणार फायदा?
2
Top Marathi News LIVE: "महागाई मॅन आता आणखी वसुली करेल"; काँग्रेसची केंद्र सरकारवर टीका
3
विधानसभा अध्यक्षांचा ‘प्रस्ताव’ बेस्टकडून माघारी पाठविण्यात आला, प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप
4
एकाच महिलेचे ४ प्रियकर; सुपारी देऊनही नवरा वाचला, उशीने तोंड दाबून बेडवरच संपवला! ऐकून अंगावर येईल काटा
5
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
6
सेल्फी, लॅप ऑफ ऑनर आणि MS धोनी-रैना जोडीची खास भेट; चेपॉकवरील भावूक क्षण (VIDEO)
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी पुन्हा विध्वंसाची भाषा; म्हणाले, "चर्चा यशस्वी झाली नाही, तर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करू"
8
शिवराज मोटेगावकरच्या अटकेनंतर ‘सीबीआय’चा महाराष्ट्रातील मुक्काम वाढला, तपासणी सत्र सुरूच!
9
समुद्रात दादागिरी! इराणने 'होर्मुझ स्ट्रेट'वर लागू केला स्वतःचा कायदा; एका जहाजाकडून वसूल करताहेत 'इतके' कोटी
10
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
11
"माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परतणार!" शेख हसीना यांचा बांगलादेशला थेट इशारा
12
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
13
अधिक मास २०२६: अधिक महिन्यात विवाहित मुलीने आईची ओटी का भरावी? सविस्तर वाचा
14
मधुचंद्राच्या रात्री असं काय घडलं की नवरदेवाने दुसऱ्याच दिवशी आयुष्य संपवलं? नवरीसह ४ जणांवर गुन्हा दाखल!
15
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
16
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
17
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
18
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
19
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
20
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! विरोधी महिला खासदारांनी पंतप्रधानांच्या आसनाला घेरले? मोदी संबोधित करणार होते, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 19:36 IST

Parliament Uproar PM Modi Speech: संसदेत पंतप्रधान मोदींच्या भाषणापूर्वी मोठा राडा झाला. भाजपने विरोधकांवर गंभीर आरोप केले आहेत, तर काँग्रेसने भाजप खासदारानेच महिलांचा अपमान केल्याचा दावा केला आहे. वाचा सविस्तर.

नवी दिल्ली: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बुधवारी अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शनाच्या प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी ५ वाजता बोलणार होते. मात्र, विरोधकांच्या प्रचंड गदारोळामुळे कामकाज तहकूब झाले आणि पंतप्रधानांचे संबोधन टळले. या घटनेनंतर भाजपने विरोधकांवर "पंतप्रधानांवर हल्ल्याचा प्रयत्न" केल्याचा अत्यंत खळबळजनक आरोप केला आहे.

दुपारी २ वाजता जेव्हा कामकाज सुरू झाले, तेव्हापासूनच विरोधक विविध मुद्द्यांवरून आक्रमक झाले होते. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी गांधी कुटुंबावर केलेल्या टीकेनंतर वातावरण अधिकच तापले. ५ वाजता जेव्हा पंतप्रधान उत्तरासाठी उभे राहणार होते, तेव्हा विरोधी पक्षाच्या खासदारांनी वेलमध्ये येऊन घोषणाबाजी सुरू केली. सभापतींनी वारंवार शांत राहण्याचे आवाहन करूनही गदारोळ न थांबल्याने कामकाज तहकूब करावे लागले.

भाजपचे गंभीर आरोप
भाजप खासदार मनोज तिवारी यांनी सभागृहाबाहेर पत्रकारांशी बोलताना गंभीर दावा केला. ते म्हणाले, "जेव्हा कामकाज स्थगित झाले, तेव्हा विरोधकांनी सर्व मर्यादा ओलांडल्या. विरोधी पक्षाचे खासदार पंतप्रधान जिथे बसतात, तिथपर्यंत चढून आले होते. विशेषतः महिला खासदारांनी पंतप्रधानांच्या खुर्चीचा घेराव केला होता. त्यांचा हावभाव पाहता, त्यांची पंतप्रधानांवर हल्ला करण्याची इच्छा असावी, असे वाटत होते." ज्येष्ठ मंत्र्यांनी विनंती करूनही महिला खासदार मागे हटण्यास तयार नव्हत्या, असेही तिवारी यांनी नमूद केले.

नेमकं काय घडलं? 
कार्यवाही स्थगित झाल्यानंतर विरोधी पक्षाचे खासदार बॅनर आणि पोस्टर्स घेऊन 'वेल'मध्ये उतरले. काही खासदार ट्रेजरी बेंचच्या (सत्ताधारी बाकांकडे) दिशेने धावले. यावेळी अनुराग ठाकूर, अश्विनी वैष्णव आणि किरण रिजिजू हे विरोधकांना शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसले.

काँग्रेसचे प्रत्युत्तर
भाजपच्या या आरोपांना काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड़ यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी सांगितले की, "पंतप्रधान तेव्हा सभागृहात नव्हतेच. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी महिलांविषयी काही आक्षेपार्ह विधाने केली होती. आम्ही (ज्योतिमणी, गनीबेन ठाकूर आणि मी) केवळ त्यांना विचारण्यासाठी त्यांच्या बाकांकडे गेलो होतो. आम्हाला येताना पाहून निशिकांत दुबे तिथून पळू लागले, म्हणून आम्ही 'पळतोय, पळतोय' असं म्हणालो. तिथे कोणतीही मारहाण किंवा हल्ल्याचा प्रयत्न झाला नाही."

राहुल गांधींचा टोला: 
दुसरीकडे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पंतप्रधानांवर टीका केली. "पंतप्रधान मोदी संसदेत येणार नाहीत कारण ते घाबरले आहेत आणि त्यांना सत्याचा सामना करायचा नाहीये," असे त्यांनी म्हटले आहे.
 

English
हिंदी सारांश
Web Title : Opposition MPs Encircle PM's Seat, Speech Delayed Amidst Parliament Uproar

Web Summary : Parliament saw chaos as opposition MPs protested, delaying PM Modi's address. BJP alleges a 'PM attack attempt' after MPs neared his seat. Congress denies attack, citing protest against BJP MP's remarks. Rahul Gandhi criticized Modi for avoiding Parliament.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीParliamentसंसदBudget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशनVarsha Gaikwadवर्षा गायकवाडcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी