शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 1 जानेवारी ते 31 डिसेंबरला होणार ?

By admin | Updated: October 13, 2016 19:20 IST

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आता जानेवारीत होणार असून, आर्थिक वर्षं 1 जानेवारी ते 31 डिसेंबर असण्याची शक्यता आहे

ऑनलाइन लोकमत नवी दिल्ली, दि. 13 - संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आता जानेवारीत होणार असून, आर्थिक वर्ष केंद्र सरकार 1 जानेवारी ते 31 डिसेंबर करण्याची शक्यता आहे, असं वृत्त झी 24 तास वृत्तवाहिनीनं दिलं आहे. ब्रिटिशांच्या कार्यकाळात भारतात आर्थिक वर्षासाठी एप्रिल ते मार्च असा कालावधी निर्धारित करण्यात आला होता. तो सध्या बदलण्याच्या विचाराधीन असल्याचं वृत्त झी 24 तास या वृत्तवाहिनीनं दिलं आहे.आर्थिक वर्षं जानेवारी ते डिसेंबर करण्याचं केंद्राच्या विचाराधीन आहे. त्यासाठी केंद्र सरकारचे माजी आर्थिक सल्लागार आणि अर्थतज्ज्ञ डॉ. शंकर आचार्य यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. भारतात ब्रिटिशांच्या राजवटीपासून कॅलेंडर वर्ष हे जानेवारी ते डिसेंबर आणि आर्थिक वर्ष हे एप्रिल-मार्च असेच ठरले आहे. जागतिकीकरणाने अर्थव्यवस्थांमध्ये स्थित्यंतरे आली असतानाच सध्याच्या केंद्र सरकारनं आर्थिक वर्षं बदलण्याचा निर्णय घेतला आहे.आर्थिक वर्ष बदलल्यास अनेक गोष्टीत बदल होणार आहे. भारतातील बहुराष्ट्रीय कंपन्यांना त्यांच्या मूळ कंपनीच्या देशानुसार हिशेब ठेवण्यात बदल करावा लागणार आहे. आर्थिक वर्षच बदलले तर ते सोयीचे जाणार असल्याचं अनेक जाणकारांचं म्हणणं आहे.  विदेशी गुंतवणूक वाढवण्यासाठी आर्थिक वर्ष बदलणे हितकारक ठरणार असल्याचीही चर्चा आहे. आर्थिक वर्षाचा निर्णय बदलल्यास त्याचे परिणाम हे सर्वव्यापी आणि बहुपदरी असतील. आर्थिक व्यवस्था बळकट करून कर-चुकवेगिरी, व्यावसायिकतेचा अभाव, तोट्यात चालणाऱ्या कंपन्या, समांतर काळ्या पैशाची इकॉनॉमी आणि काळाबाजार अशा प्रक्रिया सुधारण्याची शक्यता काही जाणकारांनी वर्तवली आहे. तर आर्थिक वर्षातील बदल अनावश्यक असल्याचे उद्योगधंद्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या असोचेम संघटनेने जाहीर केले आहे.