CoronaVirusVaccine : कोरोना लस कधीपर्यंत येणार? आरोग्य मंत्रालयानं संसदेत दिलं असं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 09:26 PM2020-09-15T21:26:05+5:302020-09-15T21:33:53+5:30

संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले आहे. देशातील कोरना रुग्णांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या हा देशाच्या दृष्टीने चिंतेचा विषय बनला आहे. सध्या कोरोनाच्या सावटाखालीच संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे.

Parliament monsoon session health ministry says about corona virus vaccine  | CoronaVirusVaccine : कोरोना लस कधीपर्यंत येणार? आरोग्य मंत्रालयानं संसदेत दिलं असं उत्तर

CoronaVirusVaccine : कोरोना लस कधीपर्यंत येणार? आरोग्य मंत्रालयानं संसदेत दिलं असं उत्तर

googlenewsNext
ठळक मुद्दे सध्या कोरोनाच्या सावटाखालीच संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सर्व खासदारांची कोरोना टेस्टदेखील करण्यात आली.देशाला कोरोना लस केव्हापर्यंत मिळू शकते? हा प्रश्नही संसदेत उपस्थित झाला.

नवी दिल्ली - संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले आहे. देशातील कोरना रुग्णांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या हा देशाच्या दृष्टीने चिंतेचा विषय बनला आहे. सध्या कोरोनाच्या सावटाखालीच संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सर्व खासदारांची कोरोना टेस्टदेखील करण्यात आली. यात काही खासदारांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरनावर मात करण्यासाठी जगातील अनेक देश कंबर कसून कोरोना लस तयार करण्याच्या कामात लागले आहेत. मात्र, सध्या कोरोना लशीसंदर्भात केवळ अंदाजच बांधले जात आहेत. 

देशाला कोरोना लस केव्हापर्यंत मिळू शकते? -
अशा संपूर्ण परिस्थितीत, देशाला कोरोना लस केव्हापर्यंत मिळू शकते? हा प्रश्नही संसदेत उपस्थित झाला. अनेक खासदारांनी कोरोना लशीसंदर्भात प्रश्न विचारले. यावर आरोग्य मंत्रालयानेही उत्तर दिले. यावर बोलताना आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे, "यासंदर्भात (देशाला कोरोना लस केव्हापर्यंत मिळू शकेल?) कुठल्याही प्रकारची कालमर्यादा निर्धारित करणे कठीन आहे."

सरकारने रशिया अथवा चीनच्या लशीसंदर्भात औपचारिक अध्ययनाला सुरुवात केली आहे, की नाही? -
याशिवाय, सरकारने रशिया अथवा चीनच्या लशीसंदर्भात औपचारिक अध्ययनाला सुरुवात केली आहे, की नाही? असा प्रश्नही संसदेत उपस्थित करण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना आरोग्य मंत्रालयाने सांगितले, की रशियन लशीसंदर्भात सध्या चर्चा सुरू आहे. मात्र कसल्याही प्रकारच्या औपचारिक अध्ययनाला सुरुवात करण्यात आलेली नाही.

देशातील काही कंपन्यांच्या कोरोना लशी, सध्या परीक्षणाच्या तिसऱ्या टप्प्यावर - 
देशातील काही कंपन्यांच्या कोरोना लशी, सध्या परीक्षणाच्या तिसऱ्या टप्प्यावर आहेत. रशियाने लस तयार केल्याचा दावा केला आहे. यापूर्वी 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना लशीची घोषणा करू शकतात, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, तसे झाले नाही. 

महत्त्वाच्या बातम्या -

PAK-चीनच्या संपत्तीतून 1 लाख कोटी कमावण्याच्या तयारीत मोदी सरकार, लवकरच आणणार कायदा!

SCOच्या बैठकीत पाकिस्तानचं नापाक कृत्य, NSA अजीत डोवालांनी केलं 'वॉकआउट'

...तर पाकिस्तानातच पकडले गेले असले अजित डोवाल!; तुम्हाला माहीत आहेत का त्यांचे 'हे' भीमप्रताप

खासदारांच्या पगारात होणार 30 टक्के कपात, लोकसभेत विधेयक मंजूर

भाजपा खासदाराची माजी सैनिकाला मारहाण; ठाकरे सरकारनं दिले चौकशीचे आदेश

मास्क ते चप्पल सर्वच मॅचिंग, बिहार निवडणुकीत सुरू आहे 'या' मुलीची चर्चा; ...आता व्हायचंय मुख्यमंत्री 

Web Title: Parliament monsoon session health ministry says about corona virus vaccine 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.