भाजपा खासदाराची माजी सैनिकाला मारहाण; ठाकरे सरकारनं दिले चौकशीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 02:19 PM2020-09-15T14:19:34+5:302020-09-15T14:24:15+5:30

निवृत्त नौदल अधिकारी मारहाण प्रकरणावरून भाजपाने शिवसेनेला घेरले असतानाच, ठाकरे सरकारनेही भाजपाला अडचणीत आणले आहे.

Maharashtra home minister anil deshmukh order to investigate retired soldier sonu mahajan case | भाजपा खासदाराची माजी सैनिकाला मारहाण; ठाकरे सरकारनं दिले चौकशीचे आदेश

भाजपा खासदाराची माजी सैनिकाला मारहाण; ठाकरे सरकारनं दिले चौकशीचे आदेश

googlenewsNext
ठळक मुद्देनिवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्यावर शिवसेनेने केलेल्या हल्ल्यानंतर, आता राज्यातील वातावरण आणखीनच तापू लागले आहे. निवृत्त नौदल अधिकारी मारहाण प्रकरणावरून भाजपाने शिवसेनेला घेरले असतानाच, ठाकरे सरकारनेही भाजपाला अडचणीत आणले आहे. भाजपा खासदार उन्मेष पाटील यांनी माजी सैनिकावर हल्ला केला होता.

मुंबई : निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्यावर शिवसेनेने केलेल्या हल्ल्यानंतर, आता राज्यातील वातावरण आणखीनच तापू लागले आहे. एका कार्टूनच्या मुद्द्यावरून शिवसैनिकांनी माजी नौदल अधिकाऱ्यावर हल्ला केला होता. मात्र, आता याच मुद्द्यावर अडचण वाढत असल्याचे पाहून शिवसेनेने 2016चा मुद्दा उकरून काढला आहे. यात भाजपा खासदार उन्मेष पाटील यांनी माजी सैनिकावर हल्ला केला होता. यासंदर्भात आता राज्यातील शिवसेना अथवा ठाकरे सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत.

निवृत्त नौदल अधिकारी मारहाण प्रकरणावरून भाजपाने शिवसेनेला घेरले असतानाच, ठाकरे सरकारनेही भाजपाला अडचणीत आणले आहे. खासदार उन्मेष पाटील यांनी चार वर्षांपूर्वी माजी सैनिक सोनू महाजन यांना मारहाण केली होती. याप्रकरणी आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिला आहेत. यामुळे भाजपाची कोंडी होण्याची शक्यता आहे.

अनिल देशमुख यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली. देशमुख यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, "२०१६ साली भाजपचे तेव्हाचे आमदार व आताचे खासदार उन्मेष पाटील व इतरांनी माजी सैनिक सोनू महाजन यांच्यावर हल्ला केला होता.तेव्हाच्या भाजप सरकारने महाजन यांना न्याय दिला नाही.यासंदर्भात मला मिळालेल्या अनेक निवेदनांनुसार पोलिसांना पाटील यांची यासंदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत."

याच बरोबर, "२०१६ साली हा गुन्हा घडला होता. पण तेव्हा भाजपचे सरकार असल्याने पाटील यांच्यावर एफआयआर दाखल झाला नाही. त्यानंतर २०१९ मध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एफआयआर दाखल करण्यात आला. परंतु पुढे कोणतीही कायदेशीर कारवाई पाटील यांच्यावर झाली नाही, असेही देशमुख यांनी म्हटले आहे."

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सोनू महाजनांना फोन करणार का? -
मुंबईतील निवृत्त नौदल अधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीवरून आकांडतांडव करणाऱ्या भाजपला सैनिकांबद्दल फारच आदर असता तर जळगावमधील माजी सैनिक सोनू महाजन यांना न्यायासाठी चार वर्षांपासून भटकावे लागले नसते. त्यांच्यावर २०१६ साली हल्ला करण्यात आला. तीन वर्षे साधा एफआयआरही दाखल केला नाही. किमान आता तरी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सोनू महाजनांना फोन करणार का, असा सवाल काँग्रेस प्रवक्ता सचिन सावंत यांनी केला आहे.

सावंत म्हणाले की, महाजन यांच्यावर २०१६ साली भाजपचे आमदार उन्मेष पाटील जे आता खासदार आहेत त्यांच्या आदेशावरून हल्ला करण्यात आला. राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार होते.

महत्त्वाच्या बातम्या -

मास्क ते चप्पल सर्वच मॅचिंग, बिहार निवडणुकीत सुरू आहे 'या' मुलीची चर्चा; ...आता व्हायचंय मुख्यमंत्री 

योगी आदित्यनाथांनी आग्र्याच्या मुघल म्यूझियमचं नाव बदललं, आता छत्रपती शिवरायांच्या नावानं ओळखलं जाणार

"जोवर श्रीमंत मराठ्यांच्या हाती 'सत्ता', तोवर गरीब मराठ्यांना ना 'सत्ता' ना 'आरक्षण'"

सोनिया सेनेमुळे मुंबई असुरक्षित, यावेळी मी वाचले; चंदीगडला पोहोचताच कंगनाचा शिवसेनेवर निशाणा

भारत-चीनदरम्यान LACवर युद्धाची तयारी? टँक्स, अधुनिक शस्त्रास्त्रे तैनात

Web Title: Maharashtra home minister anil deshmukh order to investigate retired soldier sonu mahajan case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.