शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

पार्किंग फी प्रस्ताव तांत्रिक अडचणीत सप्तशृंग गड : फेरप्रस्ताव सादर करण्याच्या सूचना

By admin | Updated: November 8, 2016 00:52 IST

नाशिक : देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेले सप्तशृंगी देवीच्या गडावर दर्शनासाठी येणार्‍या भाविकांकडून पार्किंग फी आकारण्यास जिल्हा परिषदेने मान्यता दिली असली तरी हा प्रस्ताव तांत्रिकदृष्टा अडचणीत सापडला आहे. ग्रामपंचायतीने थेट प्रस्ताव पाठविण्याऐवजी गट विकास अधिकार्‍याच्या अधिकृत पत्रासह फेरप्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून करण्यात आल्याने ग्रामपंचयातीचा पार्किंग फी आकारण्याचा प्रस्ताव पंचयात समिती जिल्हा परिषद व पुन्हा पंचायत समितीच्या घेर्‍यात सापडला आहे.

नाशिक : देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेले सप्तशृंगी देवीच्या गडावर दर्शनासाठी येणार्‍या भाविकांकडून पार्किंग फी आकारण्यास जिल्हा परिषदेने मान्यता दिली असली तरी हा प्रस्ताव तांत्रिकदृष्टा अडचणीत सापडला आहे. ग्रामपंचायतीने थेट प्रस्ताव पाठविण्याऐवजी गट विकास अधिकार्‍याच्या अधिकृत पत्रासह फेरप्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून करण्यात आल्याने ग्रामपंचयातीचा पार्किंग फी आकारण्याचा प्रस्ताव पंचयात समिती जिल्हा परिषद व पुन्हा पंचायत समितीच्या घेर्‍यात सापडला आहे. गडावर देवीच्या दर्शनासाठी येणार्‍या लाखो भाविकांवर प्रतिमाणसी २ रु पये टोल आकारणी करण्याची परवानगी मिळविण्यासाठी ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेला प्रस्ताव सादर केला होता. मात्र गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात जिल्हा परिषद सदस्यांच्या विरोधामुळे हा प्रस्ताव फेटाळण्यात आल्याने ग्रामपंचायतीने संबंधित प्रस्तावात सुधारणा करून पार्किंग फी आकारण्याचा प्रस्ताव सादर केला. मध्यंतरीच्या कालावधीत स्थायी समितीने वाहनातून येणार्‍या प्रतिव्यक्तीप्रमाणे दोन रु पये आकारण्यास मान्यताही दिली होती. या ठरावाच्या आधारे ग्रामपंचायतीने दाखल केलेल्या सुधारित प्रस्तावावर मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मोहोरही उमटविली आहे. मात्र, अंतिम मंजुरी देताना ग्रामपंचायत विभागाने थेट प्रस्ताव घेण्यास नकार देत गट विकास अधिकार्‍यामार्फत अधिकृतपत्रासह फेरप्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेची आणि गट विकास अधिकार्‍यांची मान्यता घेतली असताना फेरप्रस्ताव सादर करण्याची गरजच काय? असा सवाल ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, ग्रामपंचायत सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांची भेट घेऊन हा तांत्रिक मुद्दा खोडून काढण्याचा प्रयत्न केला त्यांना यश न आल्याने पुन्हा एकदा गट विकास अधिकार्‍यांच्या अधिकृत पत्रासह ग्रामपंचायतीला फेरप्रस्ताव मंजूर करून घेतल्यानंतर भाविकांना पार्किंग कर लागू होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)