शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

नोटा बनवण्यासाठी भारताला 'या' कंपन्या पुरवणार कागद

By admin | Updated: December 25, 2016 19:49 IST

मोदींच्या नोटाबंदीच्या घोषणेनंतर आता नव्या नोटा छापण्यासाठी केंद्र सरकार आणि आरबीआयकडून आटोकाट प्रयत्न सुरू आहेत.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 25 -  मोदींच्या नोटाबंदीच्या घोषणेनंतर आता नव्या नोटा छापण्यासाठी केंद्र सरकार आणि आरबीआयकडून आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी जगातील आठ मोठ्या कंपन्या भारताला नोटा बनवण्यासाठी लागणाऱ्या कागदांचा पुरवठाही करणार आहेत. एप्रिल 2017 पासून या कंपन्या भारताला नोटांसाठी कागदाचा पुरवठा करतील, असं वृत्त इंडियन एक्स्प्रेसनं दिलं आहे. 27, 500 मेट्रिक टन कागद भारताला मिळणार असून, यातून छोट्या मूल्याच्या नोटा छापल्या जातील. यात 10, 20, 50 आणि 100 रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. जास्त मूल्याच्या म्हणजे 500 व 2 हजार रुपयांच्या नोटांसाठीचा कागद भारत स्वत:च तयार करणार आहे. यासंदर्भात भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ नोट मुद्रण प्रा. लि. च्या मुख्य कार्यालयात करार झाला असून, यासाठी स्वित्झर्लंडमधील लँकार्ड, दक्षिण कोरियाची कोमस्को, फ्रान्सची अ‍ॅरोगिनीस, स्वीडनची क्रेन, रशियाची गोझन्क, इंडोनेशियाची पीटी प्युरा, इटलीची फेब्रियानो आणि जर्मनीच्या लुईसेन्थल या कंपनीचे अधिकारी भारतात आले होते. ब्रिटनच्या डी. ला. रू कंपनीला यावेळी डावलण्यात आले आहे. एक दशकाहून अधिक काळ डी. ला. रू ही कंपनी भारताला नोटा छपाईसाठी कागद पुरवत आली आहे. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव 2010-11 मध्ये भारतानं या कंपनीकडून कागद घेणे बंद केले होते. या कंपनीला गृह मंत्रालयाकडून प्रमाणपत्र मिळाले नसल्याचे त्यावेळी सांगण्यात आले.  दरम्यान, नोटाबंदीमुळे ख्रिसमसपूर्वीच हे मोठे काम देण्याचा निर्णय घेतल्याचे भारतीय अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या भारतात मोठ्या प्रमाणात चलनाचा तुटवडा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नोटा छापण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.