पानगाव ग्रामस्थांनी बंधार्‍याचे बांधकाम पाडले बंद

By Admin | Updated: August 19, 2015 22:27 IST2015-08-19T22:27:34+5:302015-08-19T22:27:34+5:30

पानगाव : बार्शी तालुक्यातील पानगाव येथील तीन ओढ्यांवरील बंधार्‍याचे काम सुरू आहे, मात्र ते निकृष्ट दर्जाचे असल्याने ते काम ग्रामस्थांनी बंद पाडले़

The Panguas villagers closed the construction of the dam | पानगाव ग्रामस्थांनी बंधार्‍याचे बांधकाम पाडले बंद

पानगाव ग्रामस्थांनी बंधार्‍याचे बांधकाम पाडले बंद

नगाव : बार्शी तालुक्यातील पानगाव येथील तीन ओढ्यांवरील बंधार्‍याचे काम सुरू आहे, मात्र ते निकृष्ट दर्जाचे असल्याने ते काम ग्रामस्थांनी बंद पाडले़
एका बंधार्‍याचे काम बंद करून ग्रामस्थ दुसर्‍या बंधार्‍यावर जाताच ठेकेदाराने पहिल्या बंधार्‍याचे काम पुन्हा सुरू केले़ मात्र ग्रामस्थांनी संतप्त होऊन ते काम पुन्हा बंद पाडले़ पानगाव येथील तिन्ही ओढ्यावरील बंधार्‍याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार मुकुंद पाटील, बिरमल शिंदे, विश्वनाथ कांबळे, बाळू शिंदे, शशिकांत पाटील या शेतकर्‍यांनी केली होती़ बंधार्‍याची काँक्रिटपूर्वीची खोदाई पक्क्या थरापर्यंत नसणे, वापरण्यात येत असलेले साहित्य योग्य नसणे या तक्रारी शेतकर्‍यांनी केल्या होत्या़ १५ ऑगस्टच्या ग्रामसभेतही हा विषय गाजला होता़ तिन्ही बंधार्‍यांचे अंदाजपत्रक शेतकर्‍यांना पाहायला मिळावे, दुष्काळाच्या कायमस्वरुपी उपाययोजनामधील ओढ्यावरील बंधारे उत्कृष्ट दर्जाचे व्हावे, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली होती़ त्याचा ठरावही करण्यात आला़ (वार्ताहर)
कोट
काम सुरू करण्यापूर्वी संबंधित विभागाने ग्रामपंचायतीला पत्र दिले होते, मात्र त्यानंतर अधिकार्‍यांनी कामाचा दर्जा राखणे गरजेचे होते़ तांत्रिक बाबी सांभाळून काम सुरू करण्यास हरकत नाही़
- मनोज पाटील,
सरपंच
फोटो ओळी
पानगाव (ता़ बार्शी) येथील ओढ्यावर बंधार्‍याचे काम सुरू असून ते निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार शेतकर्‍यांनी केली आहे़

Web Title: The Panguas villagers closed the construction of the dam