शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पान-2 सुधारीत बातमी दवर्लीत भाजपात

By admin | Updated: March 8, 2015 00:30 IST

दवर्लीत भाजपात बंडखोरी, सत्यविजय नाईक यांची अपक्ष उमेदवारी

दवर्लीत भाजपात बंडखोरी, सत्यविजय नाईक यांची अपक्ष उमेदवारी
33 सर्मथकांसह भाजपा नावेली मंडळ पदाचा राजीनामा : भाजपातर्फे तुयेकराचा उमेदवारी अर्ज
मडगाव : जिल्हा पंचायत निवडणुकीत दवर्लीत भाजपामध्ये बंडाळी माजली असून, तिकीट नाकारल्याच्या पार्श्वभूमीवर नावेली भाजपा मंडळाचे अध्यक्ष सत्यविजय नाईक यांनी आपल्या 33 सर्मथकांसह पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. बंडखोरी करून नाईक यांनी शनिवारी दवर्लीतून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्जही सादर केला आहे.
या मतदारसंघात भाजपा तिकिटासाठी रुमडामळ-दवर्लीचे माजी सरपंच उल्हास तुयेकर व सत्यविजय नाईक यांच्यात रस्सीखेच होती. दोघांनीही तिकिटावर आपली मजबूत दावेदारी केली होती. तिकीट कुणाला द्यावे यासाठी पक्षर्शेष्ठींनी नावेली मतदारसंघातील भाजपा मंडळाचा मतदान कौलही आजमावून बघितला होता. शेवटी शुक्रवारी उल्हास तुयेकर यांना भाजपाने उमेदवारी जारी केली होती.
शनिवारी उल्हास तुयेकर यांनी भाजपातर्फे उमेदवारी अर्ज सादर केला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, दक्षिण गोव्याचे खासदार नरेंद्र सावईकर, कामगारमंत्री आवेर्तान फुर्तादो व या मतदारसंघाचे पंच सदस्य या वेळी उपस्थित होते.
पत्रकारांशी बोलताना तुयेकर यांनी आपली उमेदवारी ही आपल्या कार्याची पक्षांनी दिलेली पोचपावती असल्याचे सांगितले.
सत्यविजय नाईक यांनीही या मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज सादर केला आहे. भाजपाचे राज्य सरचिटणीस शेख जीना, तसेच नावेली भाजपा मंडळाचे सरचिटणीस मोहन कुलकर्णी व अन्य कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. नाईक यांच्यासह कुलकर्णी यांनीही नावेली भाजपा मंडळाच्या पदाचा राजीनामा दिला आहे.
गेली 26 वर्षे आपण भाजपाशी प्रामाणिक राहिलो, उमेदवारीसाठी सदस्यांची मतेही आजमावून घेतली, यात आपल्याला 34 मते मिळाल्याचा दावा सत्यविजय नाईक यांनी केला, वरिष्ठ निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून एका अपक्ष आमदारावर विश्वास ठेवून उमेदवारी दुसर्‍याला देण्यात आली. कामगारमंत्री तथा नावेलीचे आमदार आवेर्तान फुर्तादो यांच्यावर त्यांचा रोख होता.
शेख जीना यांच्याशी पत्रकारांनी संपर्क साधला असता, आपण पक्षाचा राजीनामा दिला नाही, असे मोघम उत्तर त्यांनी दिले. दरम्यान, दुपारी माजी जिल्हा पंचायत सदस्य अतुल वेर्लेकर यांनी दवर्ली मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज सादर केला. या मतदारसंघातून त्यांनी आपल्या विजयाचा दावा केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांच्या पाठिंब्याविषयी पत्रकारांनी विचारले असता, आपण राजकारणात आल्यापासून फालेरो हे आपल्या पाठीमागे असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

ढँ3 : 0703-टअफ-06
कॅप्शन: दवर्ली मतदारसंघातून भाजपातर्फे उल्हास तुयेकर उमेदवारी अर्ज सादर करताना. सोबत भाजपाचे गोवा प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, खासदार नरेंद्र सावईकर, कामगारमंत्री आवेर्तान फुर्तादो व इतर. (छाया: अरविंद टेंगसे)

ढँ3 : 0703-टअफ-08
कॅप्शन: बंडखोरी करून सत्यविजय नाईक दवर्ली मतदारसंघातून उमेदवारी सादर केली. या वेळी त्यांच्यासोबत भाजपाचे राज्य सरचिटणीस शेख जीना व इतर. (छाया: अरविंद टेंगसे)

ढँ3 : 0703-टअफ-09
कॅप्शन: दवर्ली मतदारसंघातून माजी जिल्हा पंचायत सदस्य अतुल वेर्लेकर यांनीही आपल्या सर्मथकासह उमेदवारी अर्ज सादर केला. (छाया: अरविंद टेंगसे)