पान २- प्राणीमित्र अमृत सिंग यांच्यावर प्राणघातक हल्ला एकास अटक

By Admin | Updated: February 14, 2015 01:07 IST2015-02-14T01:07:08+5:302015-02-14T01:07:08+5:30

प्राणीमित्र अमृतसिंगवरील हल्ला गोमास तस्करीतून झाल्याचा संशय

Pan-2 - Junketman Amrit Singh was assaulted by one person on the spot | पान २- प्राणीमित्र अमृत सिंग यांच्यावर प्राणघातक हल्ला एकास अटक

पान २- प्राणीमित्र अमृत सिंग यांच्यावर प्राणघातक हल्ला एकास अटक

राणीमित्र अमृतसिंगवरील हल्ला गोमास तस्करीतून झाल्याचा संशय
साखळीतील युवकास अटक
वाळपई : प्राणिमीत्र अमृतसिंग, गोरक्षा अभियानाचे प्रमुख हनुमंत परब व गोसेवक वासुदेव झरेकर यांच्यावर गुरुवारी रात्री झालेल्या हल्लाप्रकरणी वाळपई पोलिसांनी इम्रान हमीद खान (३३, रा. साखळी) याला अटक केली आहे. इम्रान हा साखळीचे पालिकेचे उपनगराध्यक्ष रियाज खान यांचा भाउ आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्रीच बेळगाव येथ जाउन इम्रान याला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी वाळपई पोलीस निरीक्षक संजय दळवी तपास करीत आहेत.
बेळगावहून गोमांस तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याने अमृत सिंग, परब व झरेकर हे त्यासंबंधी तक्रार देण्यासाठी बेळगावला गेले होते. त्यांच्यावर पाळत ठेउन हल्ल्याचा कट रचल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. ते गुरुवारी सकाळी बेळगावला गेले होते. बोगस दाखले घेउन गोमांस तस्करी करण्यात येते अशी तक्रार त्यानी बेळगावात नोंदवली होती. दरम्यान बेळगावहून परत गोव्याकडे येत असताना रात्री ९.३० वाजता चोर्लाघाटातील जांभळीकडे एक इनोवा कार अचानक समोर येेउन थांबली व त्यातून उतरलेल्या पाचजणांनी हनुमंत परब यांच्या ईको गाडीवर हल्ला चढवला. त्यावेळी झरेकर हे गाडी चालवत होते. दरम्यान, कारचा दरवाजा उघडून दंडुक्यांनी त्या तिघांवर प्राणघातक हल्ला केला. त्यात अमृतसिंग यांच्या डोक्याला जबर मार लागला. मागून आलेल्या एका गाडीवाल्याने त्याना जखमी अवस्थेत साखळी इस्पितळात आणून सोडले. या हल्ल्यात अमृतसिंग यांच्या तोंडाचे हाड मोडले आहे, तसेच डोळ्यात काच घुसल्याने रात्री उशिरा त्यांना गोमेकॉत हलवण्यात आले. हनुमंत परब व वासुदेव झरेकर यांना साखळीतच उपचार करण्यात आले. सद्या अमृतसिंग यांची प्रकृती स्थीर असल्याची माहिती गोमेकॉतील डॉक्टरांनी दिली.
...तर अनर्थ घडला असता
हल्लेखारांची कार अचानक कार समोर येउन उभी राहिल्याने आम्हाला सावरण्यास वेळ मिळाला नाही. बघता बघता त्यानी आमच्यावर गाडीवर हल्ला चढवत आम्हला लक्ष केले. मात्र त्याच वेळी मागून काही गाड्या आल्याने हल्लेखोरांनी पळ काढला, अन्यथा त्यानी आमचे मुरडे पाडले असते, असे हनुमंत परब यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Pan-2 - Junketman Amrit Singh was assaulted by one person on the spot