शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
4
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
5
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
6
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
7
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
8
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
9
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
10
मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय?
11
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
12
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
13
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
14
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
15
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
16
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
17
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
18
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
19
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
20
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
Daily Top 2Weekly Top 5

पान १ : कुटबणातील मासेमारी बोटीवर मालवणात प्राणघातक हल्ला

By admin | Updated: May 5, 2015 01:20 IST

पेट्रोल बॉम्बचा वापर

पेट्रोल बॉम्बचा वापर
खलाशी जखमी
मालवण हद्दीत घुसल्याचे म्हणणे
बोटींची मोठी हानी

कुंकळ्ळी : दक्षिण गोव्यातील कुटबण जेटीवरून मच्छीमारी करणार्‍या तीन मच्छीमारी बोटी चुकून मालवण समुद्राच्या हद्दीत घुसल्याने तेथील स्थानिक मच्छीमारांनी वेलांकनी, इन्फंट जिजस व सी लाइफ या बोटींवरील खलाशांवर हल्ला केला. त्यांना जबर मारहाण केल्याची तक्रार कुटबण बोटमालक संघटनेने केली आहे. मालवणच्या मच्छीमारांनी या बोटींवर हल्ला करताना पेट्रोल बॉम्बचा वापर केल्याचे खलाशांनी आज सकाळी कुटबण येथे पत्रकारांना सांगितले. या हल्ल्यात तीनही बोटींवर काम करणारे कामगार जबर जखमी झाले. लाठ्या व शस्त्रे घेऊन क्रूवर हल्ला केल्याचा दावा तीनही बोटींवरील खलाशांनी केला आहे. हल्लेखोरांनी बोटींवरील गॅस सिलिंडरही चोरल्याचे खलाशांनी सांगितले.
वेलांकनी या बोटीवर काम करणारे खलाशी मारुती तांडेल यांनी या संदर्भात माहिती दिली. रविवारी (दि.३) दुपारी अडीचच्या दरम्यान तीनही बोटी भरकटल्यामुळे चुकीने मालवण हद्दीत पोहचल्या. समुद्रात पूर्वी सीमा निर्धारित करणारे दोरखंड असायचे. ते नसल्यामुळे हद्द ओलांडल्याचे या खलाशांच्या लक्षात आले नसाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. बोटी माघारी वळताना संध्याकाळी ५च्या दरम्यान सुमारे साठ जणांचा जमाव लहान होड्या घेऊन समुद्रात आला व तीनही मच्छीमारी बोटींवर हल्ला केल्याचे या खलाशांनी सांगितले.
या हल्ल्यात त्या जमावाने बोटींच्या केबिनची नासधूस केली व डिझेलची पिंपे फोडून टाकली तसेच बोटीवरील गॅस सिलिंडरही पळवून नेल्याचे खलाशांनी सांगितले. किनार्‍यावरून या जमावाने बोटींवर पेट्रोलच्या बाटल्यात आग लावून बोटी जाळून टाकण्याचाही प्रयत्न केला व जिवाच्या आकांताने पळून जाऊन या खलाशांनी गोव्याचा किनारा गाठला म्हणून त्यांचे प्राण वाचले. या घटनेची माहिती मिळताच मच्छीमारमंत्री आवेर्तान फुर्तादो, वेळ्ळी मतदारसंघाचे आमदार बेंजामिन सिल्वा, बाणावलीचे आमदार कायतू सिल्वा यांनी कुटबण जेटीवर धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मंजूनाथ नाईक, देवा गौडा, सुमन सिंग, अनुराग नाईक, वास्दू नाईक हे खलाशी या हल्ल्यात जबर जखमी झाले. (प्रतिनिधी)


चौकट

मासळी घ्या; पण मारू नका...
हल्लेखोरांना खलाशांनी सांगितले की आपण चुकून हद्द ओलांडली. मारलेली मासळी घ्या; पण आपल्याला मारू नका, अशी विनवणी केली होती. तरीही या जमावाने त्यांचे म्हणणे न ऐकता त्यांना जबर मारहाण केल्याचे या खलाशांचे म्हणणे आहे.


संबंध बिघडण्याची शक्यता
मच्छीमारमंत्री आवेर्तान फुर्तादो यांनी या संदर्भात महाराष्ट्रातील मत्र्यांशी बोलून योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन स्थानिक बोटमालकांना दिले आहे. चुकून हद्द ओलांडलेल्या मच्छीमारांना मारहाण झाल्यास दोन्ही राज्यांतील मच्छीमारांचे संबंध बिघडण्याची शक्यता आहे. या अमानुष मारहाणीचा आमदार बेंजामिन सिल्वा व आमदार कायतू सिल्वा यांनी निषेध केला आहे.

ढँङ्म३ङ्म : 0405-टअफ-14,
कॅप्शन: हल्ल्यात सापडलेल्या ट्रॉलरांची पाहणी करताना मंत्री आवेर्तान फुर्तादो, आमदार कायतू सिल्वा, आमदार बेंजामिन सिल्वा व बोटमालक संघटनेचे अध्यक्ष सिप्रियान कार्दोज. ( ़छाया - विजयकुमार कोप्रे)

ढँङ्म३ङ्म : 0405-टअफ-15,
कॅप्शन: हल्ल्यात जखमी झालेले कामगार. ( ़छाया - विजयकुमार कोप्रे)