शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानी वृत्तपत्रातील 'सर्जिकल स्ट्राईक'ची बातमी निराधार

By admin | Updated: October 14, 2016 12:58 IST

पाकिस्तानातील वृत्तपत्र 'द न्यूज इंटरनॅशनल'ने, भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केले नाही, असे भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी जर्मनीचे राजदूत यांनी सांगितले.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि.14 - उरी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केल्यापासून पाकिस्तानने धसका घेतल्याचे दिसत आहे. तसेच भारताकडून सर्जिकल स्ट्राईक झाल्याचेही पाकिस्तान वारंवार नाकारत आहे. आता पाकिस्तानातील वृत्तपत्र 'द न्यूज इंटरनॅशनल'ने, भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केले नाही, असे भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी नवी दिल्लीमध्ये जर्मनीचे राजदूत यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सांगितले', अशी बातमी छापून पाकिस्तानने पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक न झाल्याचा कागांवा केला आहे. 
 
दरम्यान, ही बातमी कथित आणि निराधार आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी स्पष्ट केले आहे. '29 सप्टेंबर रोजी परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी अन्य देशांच्या राजदूतांना भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकबाबत माहिती दिली, त्यावेळी जर्मनीचे राजदूत देखील उपस्थित होते. त्यानंतर सर्जिकल स्ट्राईकविषयी कोणतीही चर्चा झाली नाही'. असेही स्पष्ट करण्यात आले असून भारताने पाकिस्तानी मीडियाने छापलेले कथित वृत्त फेटाळून लावले आहे. 
आणखी बातमी 
पाकिस्तानातील वृत्तपत्र 'द न्यूज इंटरनॅशनल'ने, 'भारताचे परराष्ट्र सचिव यांनी स्पष्ट शब्दांत भारतीय सैन्यांनी पाकिस्तानविरोधात सर्जिकल स्ट्राईक केले नाही' अशी कथिक आणि खोटी बातमी सूत्रांची माहिती देत छापली होती. 
दरम्यान, डॉन वृत्तपत्रात, पाकिस्तानातील दहशतवाद्यांविरोधात ठोस कारवाई होत नसल्याने पाकिस्तानच्या सरकारने तेथील लष्कराविरोधात नाराजी व्यक्त केली आहे, अशी बातमी पत्रकार सायरिल अलमिडा यांनी छापली होती. त्यानंतर 'द न्यूज इंटरनॅशनल'ने ही कथित आणि निराधार बातमी छापली आहे.
उरी येथील भारतीय लष्कराच्या मुख्यालयावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 20 जवान शहीद झाले होते. याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने 29 सप्टेंबर रोजी पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक करुन पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. मात्र, सीमारेषेजवळ भारताकडून केवळ गोळीबार करण्यात आल्याचे सांगत सर्जिकल स्ट्राईक झाल्याचे पाकिस्तानने नाकारले आहे.