एलओसीवर पाकचा गोळीबार; दोन जवान शहीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2020 07:01 IST2020-10-02T07:01:06+5:302020-10-02T07:01:25+5:30

पाकिस्तानने कुपवाडा जिल्ह्यातील नौगाम विभागातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत गुरुवारी सकाळी गोळीबारासोबत उखळी तोफांचा मारा केला

Pak firing on LOC; Two young martyrs | एलओसीवर पाकचा गोळीबार; दोन जवान शहीद

एलओसीवर पाकचा गोळीबार; दोन जवान शहीद

श्रीनगर : पाकिस्तानी सैनिकांनी गुरुवारी कुपवाडा जिल्ह्यांत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत गोळीबारापाठोपाठ तोफगोळ्यांनी केलेल्या माऱ्यात भारतीय लष्कराचे तीन जवान शहीद झाले.

पाकिस्तानने कुपवाडा जिल्ह्यातील नौगाम विभागातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत गुरुवारी सकाळी गोळीबारासोबत उखळी तोफांचा मारा केला. यात दोन जवान शहीद झाले, तर अन्य चार जण जखमी झाले. जखमी जवानांना उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
भारतीय जवानांनी पलटवार करून पाकिस्तानच्या गोळीबाराला तडाखेबाज उत्तर दिले. केरान आणि मछील विभागातही पाकिस्तानने गोळीबार केला, असे श्रीनगरस्थित संरक्षण प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी सांगितले.

Web Title: Pak firing on LOC; Two young martyrs