शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 07:27 IST

अमेरिकेसाठी आम्ही हे घाणेरडे काम केले, आता त्या चुकीची शिक्षा भोगावी लागतेय

लंडन - पाकिस्ताननेच आतापर्यंत दहशतवाद्यांना पोसले असल्याचे सत्य अखेर समोर आले आहे. खुद्द पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी याची कबुली दिली आहे. आमच्या देशाने गेल्या ३० वर्षांपासून दहशतवाद्यांना पाठिंबा, प्रशिक्षण आणि निधी देण्याचे काम केले आहे. अमेरिका आणि पाश्चात्त्य देशांसाठी हे ‘घाणेरडे काम’ आम्हाला करावे लागत असून, पाकिस्तानला या चुकीची किंमत मोजावी लागली आहे, अशी कबुली पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी दिली आहे.

ख्वाजा आसिफ यांनी शुक्रवारी ब्रिटिश वृत्तपत्र ‘द स्काय’ला दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केले आहे. ब्रिटिश अँकर यल्दा हकीम यांनी त्यांना विचारले की, दहशतवादी गटांच्या कारवायांसाठी पाकिस्तान जबाबदार आहे का? यावर ते म्हणाले की, जागतिक शक्तींनी त्यांच्या फायद्यासाठी पाकिस्तानचा वापर केला. आसिफ यांनी कबूल केले की, दहशतवाद्यांना पाठिंबा देणे किंवा प्रशिक्षण देणे ही एक मोठी चूक होती. याची शिक्षा आम्ही भोगत आहोत. जर आपण सोव्हिएत युनियनविरुद्धच्या युद्धात सामील झालो नसतो आणि ९/११ च्या हल्ल्यानंतर जी काही परिस्थिती निर्माण झाली, ती झाली नसती तर पाकिस्तानचे रेकॉर्ड निष्कलंक राहिले असते.

आजचे हे सर्व दहशतवादी वॉशिंग्टनमध्ये मजा करत होते या प्रदेशात जे काही घडत आहे, त्यासाठी पाकिस्तानला दोष देणे मोठ्या शक्तींना सोयीस्कर आहे. १९८० च्या दशकात जेव्हा आम्ही सोव्हिएत युनियनविरुद्ध त्यांच्या वतीने युद्ध लढत होतो, तेव्हा आजचे हे सर्व दहशतवादी वॉशिंग्टनमध्ये मजा करत होते आणि मग ९/११ चा हल्ला झाला. तीच परिस्थिती पुन्हा घडली. मला वाटते की आमच्या सरकारांनी त्यावेळी चूक केली होती. त्यावेळी पाकिस्तानचा वापर ‘प्रॉक्सी’ (मुखवटा) म्हणून केला जात होता, असेही त्यांनी सांगितले.

ती दहशतवादी संघटनाच संपलीपहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी पाकिस्तानवर लावलेले आरोप आणि हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या ‘द रेझिस्टेन्स फ्रंट’ची बंदी घातलेली संघटना लष्कर-ए-तैयबा (एलईटी)शी संबंध असल्याबद्दल मंत्र्यांना विचारण्यात आले असता आसिफ म्हणाले की, लष्कर-ए-तैयबा आता पाकिस्तानात नाही. ती संपली आहे. जर मूळ संघटना अस्तित्वात नसेल तर येथे शाखा कशी निर्माण होऊ शकते? 

...तर थेट युद्ध होईल, दोन्ही देशांकडे अण्वस्त्रेपहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे पाकिस्तानला तणाव वाढण्याची भीती आहे का, असे विचारले असता, मंत्री म्हणाले की, पाकिस्तान त्यांच्या पद्धतीनेच प्रत्युत्तर देण्यास तयार आहे. भारताच्या कोणत्याही कारवाईला आम्ही तसाच प्रतिसाद देऊ. हे एक विचारपूर्वक उचललेले पाऊल असेल. जर ताकदीने हल्ला झाला किंवा असे काही झाले तर थेट युद्ध होईल. दोन्ही देशांकडे अण्वस्त्रे असल्याने जगाने काळजी करावी, असे ते म्हणाले. मात्र, दोन्ही देश चर्चेद्वारे हा प्रश्न सोडवतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndiaभारतAmericaअमेरिका