‘अ‍ॅटलस सायकल’च्या शेवटच्या कारखान्याचे ‘पॅडल’ थांबले!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2020 05:14 AM2020-06-06T05:14:45+5:302020-06-06T05:14:55+5:30

‘जागतिक सायकलदिनी’च थांबविले उत्पादन

The paddle of the last factory of 'Atlas Cycle' stopped! | ‘अ‍ॅटलस सायकल’च्या शेवटच्या कारखान्याचे ‘पॅडल’ थांबले!

‘अ‍ॅटलस सायकल’च्या शेवटच्या कारखान्याचे ‘पॅडल’ थांबले!

Next

नवी दिल्ली : एकेकाळी देशात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या ‘अ‍ॅटलस सायकल’ने दिल्लीजवळील साहिबाबाद येथील आपला शेवटचा सायकल उत्पादक कारखाना बंद केला आहे. कंपनीने ३ जून रोजी या प्रकल्पातील काम थांबविले. योगायोग म्हणजे त्यादिवशी ‘जागतिक सायकल दिन’ होता. कंपनीने शेवटच्या ४३१ कर्मचाऱ्यांनाही काढून टाकले आहे.


याआधी मालनपूर आणि सोनिपत येथील प्रकल्प कंपनीने बंद केले आहेत. १९५१ साली सोनिपत येथील प्रकल्पानेच कंपनीची सुरुवात झाली होती. १९८२ साली दिल्लीतील आशियाई खेळांसाठी कंपनीने सायकली पुरविल्या होत्या.


कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीएमडी) एन. पी. सिंह राणा यांनी सांगितले की, कारखाना हंगामी स्वरूपात बंद करण्यात आला आहे. कंपनीकडे वापर नसलेला एक भूखंड पडून आहे. तो विकून ५० कोटी रुपये उभे केले जातील. त्यानंतर कारखाना पुन्हा सुरू केला जाईल.


काढण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना दैनिक हजेरीच्या आधारावर निलंबन कालावधीचे वेतन नियमानुसार दिले जाईल. हे वेतन किती असेल याचा खुलासा राणा यांनी केला नाही. तथापि, निलंबन कालावधीत साधारणत: मूळ वेतनाच्या ५० टक्के हिस्सा आणि महागाई भत्ता दिला जातो. साहिबाबाद येथील हा प्रकल्प कंपनीचा सर्वांत मोठा सायकल उत्पादक प्रकल्प होता. येथे १९८९ मध्ये सायकल उत्पादन सुरू करण्यात आले होते. येथे दरमहा दोन लाखांपेक्षा अधिक सायकलींचे उत्पादन होत होते. दरम्यान, कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न देता कारखाना बंद केल्याचा आरोप कर्मचाºयांनी केला आहे.

च्कंपनीने बुधवारी गेटवर चिकटवलेल्या नोटिसीत म्हटले की, गेल्या अनेक वर्षांपासून कंपनी भांडवलासाठी संघर्ष करीत आहे. कारखाना चालविण्यासाठीही कंपनीकडे पैसे नाहीत.
च्कच्चा माल खरेदी करण्यातही आम्ही असमर्थ आहोत. अशा परिस्थितीत कारखाना चालू ठेवणे अशक्य आहे. कर्मचाºयांना सुट्या वगळून हजेरी भरण्यास सांगण्यात आले आहे.

Web Title: The paddle of the last factory of 'Atlas Cycle' stopped!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.