शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

एअर इंडिया टिकली तरच नोकरी टिकेल

By admin | Updated: December 26, 2016 00:53 IST

एअर इंडियाचे कर्मचारी प्रतिस्पर्धी विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेच्या तुलनेत मागे आहेत. कंपनी टिकून राहिली तरच नोकरी सुरक्षित राहील

नवी दिल्ली : एअर इंडियाचे कर्मचारी प्रतिस्पर्धी विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेच्या तुलनेत मागे आहेत. कंपनी टिकून राहिली तरच नोकरी सुरक्षित राहील, अशा शब्दांत नागरी उड्डयन मंत्री अशोक गजपती राजू यांनी संकेत दिले. २०१५-२०१६ या आर्थिक वर्षात एअर इंडिया फायद्यात होती व काम चांगले झाले, असे सांगताना त्यांनी अधिक समन्वयाने काम होणे गरजेचे आहे यावर भर दिला. सध्या केंद्र सरकारच्या आर्थिक मदतीवर असलेली एअर इंडिया आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यात खर्च कमी करणे, उपलब्ध साधनांचा व क्षमतांचा जास्तीत जास्त उपयोग करणे, नवी उड्डाणे सुरू करण्याचा समावेश आहे.एअर इंडियावर सगळीकडून टीका होत असताना राजू हे एअर इंडियाची पाठराखण करतात. ते म्हणाले एअर इंडियाने चांगले काम केले असले तरी आणखी चांगले केले जाऊ शकते. एअर इंडियात समन्वयाची गरज आहे, असे ते एका मुलाखतीत म्हणाले. राजू म्हणाले, स्पर्धक कंपन्यांच्या काही कर्मचाऱ्यांनी दाखवलेली निष्ठा आणि एअर इंडियाच्या काही कर्मचाऱ्यांनी दाखवलेली निष्ठा यात काही अंतर आहे. ही संतुष्टता एअर इंडियातील नोकरीची काळजी नसण्याच्या भावनेतून निर्माण झाली आहे का असे विचारता गजपती राजू म्हणाले की नोकरीची हमी आहे पण जो पर्यंत एअर इंडिया टिकून आहे तोपर्यंतच. जेथे संस्था टिकून राहतात तेथेच नोकरीही टिकून राहते. जेव्हा संस्थाच राहात नाही तेव्हा तुमच्या नोकरीचे काय होणार असा प्रश्न त्यांनी विचारला. (लोकमत न्यूज नेटवर्क)