शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

केरळमध्ये आता फक्त पंचतारांकित मद्यालये !

By admin | Updated: December 30, 2015 03:59 IST

सुप्रीम कोर्टाने केरळमध्ये फक्त पंचतारांकित हॉटेल्सनाच बारचा परवाना देण्याच्या राज्य सरकारच्या मद्य धोरणावर मंगळवारी शिक्कामोर्तब केले. यामुळे आता पर्यटकांचे पसंतीचे

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने केरळमध्ये फक्त पंचतारांकित हॉटेल्सनाच बारचा परवाना देण्याच्या राज्य सरकारच्या मद्य धोरणावर मंगळवारी शिक्कामोर्तब केले. यामुळे आता पर्यटकांचे पसंतीचे ठिकाण असलेल्या आणि ‘गॉड्स ओन कन्ट्री’ अशी ओळख असलेल्या केरळमध्ये मद्यशौकिनांना पंचतारांकित हॉटेल्समधील फक्त २४ बारमध्येच आपली तल्लफ भागविता येईल.न्या. विक्रमजीत सेन आणि न्या. शिव कीर्ती सिंग यांच्या खंडपीठाने केरळमधील बारमालकांच्या याचिकेवर सुनावणी करताना हा निकाल दिला. याचिकाकर्त्या बारमालकांनी राज्याच्या मद्य धोरणाला आव्हान देताना ते पक्षपाती असल्याचा आरोप केला होता. या धोरणामुळे रोजगार गमविणाऱ्या लोकांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकार योग्य उपाययोजना करेल, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले. आॅगस्टमध्ये या प्रकरणी सुनावणी पूर्ण केल्यानंतर खंडपीठाने आपला निर्णय राखून ठेवला होता. न्या. सेन सेवानिवृत्त होण्याच्या एक दिवस आधी मंगळवारी हा निकाल जाहीर करण्यात आला. (लोकमत न्यूज नेटवर्क)दारूमुक्तीचे धोरण...सन २०२३पर्यंत केरळ पूर्णपणे दारूमुक्त करण्याचा राज्य सरकारचा मानस असून, त्या अनुषंगाने हे धोरण आखण्यात आले आहे. केरळ उच्च न्यायालयाने ३० आॅक्टोबर २०१४ रोजी राज्यातील ७००च्या वर बार बंद करणे; आणि चार तारांकित हॉटेल्सला मात्र यातून वगळण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले होते. दरडोई सरासरी मद्यसेवनात देशात केरळचा वरचा क्रमांक लागतो.केरळ सरकारचे मद्य धोरण पक्षपाती असून, यामुळे फक्त श्रीमंत लोकांनाच मद्य मिळू शकेल, असा युक्तिवाद बारमालकांनी केला होता. तर बार मालकांच्या परवान्यांचे नूतनीकरण न करण्याचा निर्णय धोरणात्मक असल्याचे सरकारचे म्हणणे होते. बारमालकांनी दारूवरील अंशीक बंदीला विरोध केला होता.