शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

एक देश, एक निवडणूक! पंतप्रधान मोदींचे आग्रही प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2020 07:29 IST

पंतप्रधान मोदींचे आग्रही प्रतिपादन; एकाच मतदार यादीचीही गरज

केवडिया (गुजरात) : देशात सर्व राज्यांच्या विधानसभा निवडणुका लोकसभा निवडणुकीबरोबरच घेतल्या जाव्यात, या आग्रही मताचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुनरुच्चार केला आहे. येथील एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधानांनी ‘एक देश, एक निवडणूक’, ही काळाची गरज असल्याचे स्पष्ट केले. तसेच सर्व निवडणुकांसाठी एकच मतदार यादी असावी, असेही मत मोदी यांनी व्यक्त केले.

पीठासीन अधिकाऱ्यांच्या ८८व्या अखिल भारतीय परिषदेच्या समारोपप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी मोदी म्हणाले, ‘निवडणुका ही खर्चीक बाब आहे. तसेच सतत निवडणुका होत राहिल्यास विकासकामेही रखडतात.

समन्वयाची गरज या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधानांनी  विधिमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका या तीन संस्थांमध्ये उत्तम समन्वयाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. राज्यघटनेत या तीनही यंत्रणांना अनन्यसाधारण महत्त्व असल्याचेही ते म्हणाले. २६/११च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना मोदी यांनी यावेळी श्रद्धांजली वाहिली. 

पंतप्रधान उद्या पुण्यात, लसीचा घेणार आढावापंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देण्यासाठी येत आहेत. ‘सीरम’मध्ये सुमारे तासभर थांबून कोरोनावरील लस उत्पादनाची माहिती घेणार  आहेत. त्यानंतर ते हैदराबादला जाणार आहेत.  

खर्च कमी होईल, विकासकामेही होतीलn आपल्या देशात अनेक ठिकाणी कोणत्या ना कोणत्या निवडणुका सुरूच असतात. n लोकसभा निवडणुकीबरोबरच सर्व राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्या तर या खर्चात बचत होऊन विकासकामांना गती येईल. तसेच सर्व निवडणुकांसाठी एकच मतदारयादी असावी. n सर्व प्रकारच्या निवडणुकांसाठी सातत्याने मतदारयाद्या अद्ययावत कराव्या लागतात. त्यामुळे पैशांचाही अपव्यय होतो. ते टाळण्यासाठी एकच मतदारयादी गरजेची आहे.’

‘एक देश, एक निवडणूक’ हा केवळ चर्चेचा विषय नसून ती देशाची गरज आहे. देशात अनेक ठिकाणी कोणत्या ना कोणत्या निवडणुका सुरू असतात. त्याचा विकासकामांवर परिणाम होतो.          - नरेंद्र मोदी, पंतप्रधान

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाElectionनिवडणूक