अरे बापरे ! नोकरीचा तगादा लावणा-या आईला मुलाने जिवंत जाळलं

By Admin | Updated: August 23, 2016 11:54 IST2016-08-23T11:48:05+5:302016-08-23T11:54:03+5:30

बेरोजगार असल्याने सतत नोकरी कर म्हणून ओरडणा-या आपल्याच आईला मुलाने जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

Oh dear! The child was burned to death by the mother of the victim | अरे बापरे ! नोकरीचा तगादा लावणा-या आईला मुलाने जिवंत जाळलं

अरे बापरे ! नोकरीचा तगादा लावणा-या आईला मुलाने जिवंत जाळलं

>- ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 23 - बेरोजगार असल्याने सतत नोकरी कर म्हणून ओरडणा-या आपल्याच आईला मुलाने जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. थिरुसूलम परिसरात ही घटना घडली आहे. मुलगा अल्पवयीन असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. 
 
वेलुथाई असं पीडित महिलेचं नाव असून चेन्नई विमानतळावर हाऊसकीपर म्हणून त्या काम करत होत्या. त्यांना तीन मुले आहेत. मोठा मुलगा मुथी कुमार लॉरी ड्रायव्हर म्हणून काम करतो तर छोटा मुलगा सुरेश शिक्षण घेत आहे. पती रोजंदारी कामगार आहे. आरोपी मुलाला शाळेतून काढून टाकण्यात आलं होतं आणि बेरोजगार होता. 
 
'रविवारी रात्री आरोपी मुलाने वेलुथाईंकडे काही पैसे मागितले. यावेळी पैसे देण्यास नकार देत वेलुथाईंनी त्याला ओरडण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने वेलुथाईंच्या अंगावर केरोसिन ओतून त्यांना पेटवून दिले', अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. वेलुथाईंचा ओरडण्याचा आवाज ऐकून त्यांचा मुलगा आणि पती घरात पळत आले. आग विझवून त्यांनी वेलुथाईंना रुग्णालयात नेलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 
 
पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतलं आहे. अल्पवयीन असल्याने त्याची सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. 
 

Web Title: Oh dear! The child was burned to death by the mother of the victim