अधिकाऱ्याने इमारतीवरून मारली उडी, चंडीगड सिव्हिल सेक्रेटरिएटमधील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 17:30 IST2026-02-25T17:25:29+5:302026-02-25T17:30:52+5:30
Haryana News: हरयाणा सिव्हिल सेक्रेटरिएटवरून एका अधिकाऱ्याने कथितपणे उडी मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे.

अधिकाऱ्याने इमारतीवरून मारली उडी, चंडीगड सिव्हिल सेक्रेटरिएटमधील धक्कादायक घटना
हरयाणा सिव्हिल सेक्रेटरिएटवरून एका अधिकाऱ्याने कथितपणे उडी मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार मृत अधिकाऱ्याची ओळख गणेश दत्त म्हणून पटली आहे. ते एका आयएएस अधिकाऱ्याच्या कार्यालयात तैनात होते, असे सांगण्यात येत आहे. ही घटना घडली तेव्हा त्यांनी हरयाणा सिव्हिल सेक्रेटरिएटच्या वरच्या मजल्यावरून खाली उडी मारली. घटनास्थळावर उपस्थित असलेल्या लोकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले. मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला आहे. मात्र त्यांनी एवढा टोकाचा निर्णय घेत जीवन का संपवले हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. पोलीस आत्महत्या आणि इतर संभाव्य कारणांचा विचार करून पुढील तपास करत आहेत.