शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

ओबामांसाठी टेहळणी उपग्रह तैनात करणार

By admin | Updated: January 6, 2015 23:54 IST

अमेरिकेची गुप्तचर सेवा आगामी भारत दौऱ्यासाठी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या सुरक्षा व्यवस्थेची तयारी करताना सुरक्षेत केसाएवढीही त्रुटी राहणार नाही याची खबरदारी घेत आहे.

नवी दिल्ली : अमेरिकेची गुप्तचर सेवा आगामी भारत दौऱ्यासाठी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या सुरक्षा व्यवस्थेची तयारी करताना सुरक्षेत केसाएवढीही त्रुटी राहणार नाही याची खबरदारी घेत आहे. ईगल आय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकी गुप्तचर सेवेचे अत्याधुनिक पथक यापूर्वीच भारतात दाखल झाले असून ते राष्ट्राध्यक्षांच्या कार्यक्रमपत्रिकेवरील विविध स्थळांच्या सुरक्षेचा भारतीय सुरक्षा संस्थांसोबत आढावा घेत आहे. भारतीय प्रजासत्ताक दिनास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणारे बराक ओबामा हे पहिले अमेरिकी राष्ट्राध्यक्ष आहेत. राष्ट्राध्यक्षांच्या प्रत्येक हालचालीचा माग ठेवण्यासाठी अमेरिकी गुप्तचर सेवा उपग्रहाद्वारे टेहळणी करणार असल्याचे वृत्त आहे. ओबामा राजपथावरून मार्गक्रमण करत अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी असलेल्या कक्षात येऊन स्थानापन्न होईपर्यंत उपग्रहांची सभोवती अत्यंत बारीक नजर असेल. गुप्तचर सेवेच्या अनेक एजंटशिवाय अमेरिका ओबामांच्या सुरक्षेसाठी अमेरिकी नौसैनिकांचे एक खास पथकही पाठवत आहे. अमेरिकी प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या सुरक्षा व्यवस्थेत नेमबाजांचे पथक व शोधकश्वानांच्या पथकाचाही समावेश आहे. ओबामांभोवतीचे पहिले सुरक्षा कडे अमेरिकी सुरक्षा दलांचे असेल, तर दुसरे कडे भारताचे एनएसजी कमांडो व तिसरे कडे दिल्ली पोलिसांचे असणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)