मध्य प्रदेशात महिलेची नग्न धिंड

By Admin | Updated: June 15, 2014 02:46 IST2014-06-15T02:46:28+5:302014-06-15T02:46:28+5:30

मध्य प्रदेशच्या खांडवा जिल्ह्यातील भिलाई खेडा या गावात एका महिलेवर दहा जणांनी अत्याचार करून तिची गावातून विवस्त्र धिंड काढल्याची अमानुष घटना घडली आहे

Nude Dhind of the woman in Madhya Pradesh | मध्य प्रदेशात महिलेची नग्न धिंड

मध्य प्रदेशात महिलेची नग्न धिंड

खांडवा : मध्य प्रदेशच्या खांडवा जिल्ह्यातील भिलाई खेडा या गावात एका महिलेवर दहा जणांनी अत्याचार करून तिची गावातून विवस्त्र धिंड काढल्याची अमानुष घटना घडली आहे. जखमी अवस्थेतील या महिलेने जेव्हा पाणी मागितले तेव्हा तिच्या तोंडात मूत्र घालून त्या क्रूरकर्म्यांनी क्रौर्याची परिसीमाही पार केली. या वेळी तिचा पतीही तेथेच हजर होता.
या महिलेने पोलिसांत तक्रार नोंदविली असून त्यानुसार, तिचा आपल्या कैलास नावाच्या नवऱ्यासोबत जमिनीवरून वाद सुरू होता. त्यामुळे ती आपल्या माहेरी राहावयास गेली होती. १० जूनला तिच्या नवऱ्याने तिला साक्ष देण्यासाठी बोलावले असता ती आपल्या दहा वर्षांच्या मुलाला सोबत घेऊन आली. यावेळी तिच्या नवऱ्याने तिला एका शेतात बोलाविले व तेथे मारहाण करून तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. तिला नग्न करून गावातून तिची धिंड काढली. आईवर होणाऱ्या अत्याचाराला रोखण्यासाठी पुढे आलेल्या तिच्या मुलालाही त्यांनी मारहाण केली.
या महिलेच्या कुटुंबीयांना तिला रुग्णालयात दाखल केले. या महिलेचा जबाब नोंदवून घेतल्यानंतर तिचा नवरा व अन्य दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिचा नवरा, चुलत सासरा व अन्य चार आरोपींना अटक केली. (वृत्तसंस्था)

Web Title: Nude Dhind of the woman in Madhya Pradesh