शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्टेशनवर आता फेसबुककडूनही वाय-फाय

By admin | Updated: August 26, 2016 04:10 IST

गुगलनंतर आता फेसबुकही भारतीय रेल्वेला ‘वाय-फाय’ सेवा देण्यासाठी सज्ज झाली आहे.

नवी दिल्ली : गुगलनंतर आता फेसबुकही भारतीय रेल्वेला ‘वाय-फाय’ सेवा देण्यासाठी सज्ज झाली आहे. रेल्वे स्टेशनसह परिसरातील गावांतही इंटरनेट देण्याची फेसबुकची योजना असून, रेल्वेच्या ‘रेल टेल’ विभागाचे प्रमुख आर.के. बहुगुणा यांनी सांगितले की, याबाबत लवकरच फेसबुकच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येईल. फेसबुक इंडियाने वाय-फाय सुविधा देण्याबाबत आमच्याशी संपर्क केला आहे, असे सांगून बहुगुणा म्हणाले की, केवळ रेल्वे स्टेशनच नव्हे, तर आसपासच्या गावांतही इंटरनेट सुविधा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. रेल्वे स्टेशनच्या जवळील १० कि.मी. क्षेत्रात वाय-फायची सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. नंतर अतिरिक्त अ‍ॅक्सेस पॉइंटच्या माध्यमातून हे क्षेत्र २५ कि.मी.पर्यंत वाढविणे शक्य आहे. त्याद्वारे रेल टेल ४० हजार गावांत वाय-फाय पोहोचविण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र फेसबुककडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. ‘रेल टेल’ हे देशातील ४ हजार रेल्वे स्टेशनवर सहज उपलब्ध होणारे फायबर नेटवर्क आहे. गुगलसोबत काही महिन्यांपूर्वीच वाय-फायबाबत एक करार करण्यात आला आहे. त्याद्वारे १०० रेल्वे स्टेशनवर वर्षअखेरपर्यंत वाय-फाय उपलब्ध होणार आहे. गुगलच्या या योजनेतून दर महिन्याला २० लाख लोकांना वाय-फाय सुविधेचा लाभ होणार आहे, तर फेसबुकच्या माध्यमातून छोट्या स्टेशनवरही वाय-फायचा लाभ मिळावा, असा ‘रेल टेल’चा प्रयत्न आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)> विमानातही वाय-फाय भारतीय हवाई हद्दीतील विमानांतही लवकरच वाय-फाय सुविधा मिळणार आहे. नागरी उड्डयण सचिव आर. एन. चौबे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. येत्या १० दिवसांत याबाबतचा निर्णय होणार आहे. सध्या विमानातील प्रवाशांना भारतीय हवाई हद्दीत मोबाइल आणि इंटरनेट वापरण्याची मुभा नाही. परंतु आता वाय-फाय सुविधा वापरण्याला लवकरच परवानगी मिळणार आहे.