शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आता १५ वर्षांपेक्षा जास्त जुनी वाहने टाकावी लागणार भंगारात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2021 07:09 IST

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, नव्या वाहनांची मागणी वाढावी, यासाठी आम्ही हे धोरण आणत आहोत.

नवी दिल्ली : तुमच्याकडे १५ वर्षांपेक्षा अधिक जुने वाहन असेल, तर ते तुम्हाला लवकरच भंगारात काढावे लागेल, अशी शक्यता आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने यासंबंधीचा एक प्रस्ताव सरकारला सादर केला असून, त्याला लवकरच मंजुरी मिळू शकते. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, नव्या वाहनांची मागणी वाढावी, यासाठी आम्ही हे धोरण आणत आहोत. शिवाय जुन्या वाहनांमुळे प्रदूषणही मोठ्या प्रमाणात होते.‘आत्मनिर्भर भारत इनोव्हेशन चॅलेंज २०२०-२१’ या कार्यक्रमाला संबोधित करताना गडकरी यांनी म्हटले की, आम्ही यासंबंधीचा प्रस्ताव दिला आहे. याला लवकरात लवकर मान्यता मिळेल, अशी मला अपेक्षा आहे. १५ वर्षांपेक्षा जास्त जुन्या कार, बस आणि ट्रक अशा सर्व व्यावसायिक आणि खाजगी वाहनांना हा नियम लागू राहील. अर्थसंकल्प तोंडावर आलेला असतानाच गडकरी यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यामुळे येत्या १ फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात वित्तमंत्री निर्मला सीतारामन या धोरणाची घोषणा करू शकतात. यासंबंधीचा अंतिम निर्णय पंतप्रधान कार्यालय घेईल. जुनी आणि अधिक प्रदूषण करणारी वाहने भंगारात निघाल्यास अर्थव्यवस्थेला फायदे होतील. गडकरी यांनी सांगितले की, या धोरणाला मान्यता मिळाल्यास भारत वाहन उद्योगाचे केंद्र बनेल.  भंगारात निघालेल्या वाहनांचे साहित्य पुनर्प्रक्रिया करून नव्या वाहनांच्या निर्मितीसाठी वापरले जाऊ शकते. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपा