शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

Baba Ramdev: आता रामदेव बाबांनी उडविली डॉक्टरांची खिल्ली; बोलले, "डिग्रीशिवाय मी बनलो डॉक्टर"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 20:25 IST

Ramdev Baba Controversial statement: ॲलोपॅथी हे मूर्ख विज्ञान आहे, असे म्हणत त्यांनी देशभरात वाद उभा केला होता. जेव्हा त्यांच्यावर कारवाई झाली तेव्हा त्यांनी हे वक्तव्य मागे घेत असल्याचे म्हटले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी एका मुलाखतीमध्ये त्यांनी डॉक्टरांची खिल्ली उडविली आहे.

अॅलोपथीवरून दोन दिवसांच्या वादावर पडदा टाकणाऱ्या रामदेव बाबांनी  (Baba Ramdev)  पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. आता त्यांनी कोरोना वॉरियरवर वार केला आहे. ॲलोपॅथी हे मूर्ख विज्ञान आहे, असे म्हणत त्यांनी देशभरात वाद उभा केला होता. जेव्हा त्यांच्यावर कारवाई झाली तेव्हा त्यांनी हे वक्तव्य मागे घेत असल्याचे म्हटले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी एका मुलाखतीमध्ये त्यांनी डॉक्टरांची खिल्ली उडविली आहे. (Ramdev Baba once again Controversial statement on Doctors.)

योग गुरु बाबा रामदेव यांनी एका योग शिबिरातील तरुणासोबत झालेल्या चर्चेचा हवाला देऊन डॉक्टरांची खिल्ली उडविली आहे. तसेच १००० हून अधिक डॉक्टर कोरोना लसीचे दोन डोस घेऊनही मृत्यूमुखी पडले आहेत. ते डॉक्टर स्वत:लाच वाचवू शकले नाहीत, असे रामदेव बाबा यांनी म्हटले आहे. रामदेव बाबा या व्हिडीओमध्ये म्हणत आहेत की, डॉक्टर बनायचे असेल तर रामदेव बाबासारखे बना. ज्याच्याकडे कोणतीही डिग्री नाहीय, परंतू सर्वांचा डॉक्टर आहे. विदाऊट एनी डिग्री, डिग्निटी आय अॅम अ डॉक्टर. 

या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा आयएमएने आक्षेप घेतला आहे. आयएमएने उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांना रामदेव बाबांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

रामदेव बाबांना हर्षवर्धन यांनी फटकारलेले...

"संपूर्ण देशातील नागरिकांसाठी डॉक्टर्स देवदूत ठरत आहेत. ते दिवसरात्र मेहनत घेऊन रुग्णांची सेवा करत आहेत. बाबा रामदेव यांनी उपचारांसंबंधी केलेलं विधान म्हणजे कोरोना योद्धांच्या भावनांना ठेच पोहोचवणारं आहे. यासंदर्भात फक्त स्पष्टीकरण देऊन चालणार नाही. बाबा रामदेव यांनी आपलं विधान जाहीरपणे मागे घ्यायला हवं", असं डॉ. हर्षवर्धन यांनी बाबा रामदेव यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं.

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाdoctorडॉक्टर