शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
2
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
3
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
4
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
5
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
6
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
7
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
8
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
9
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
10
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
11
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
12
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
13
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
14
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
18
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
19
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
20
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
Daily Top 2Weekly Top 5

प. बंगालमध्ये आता बांधले जाणार राम मंदिर; भाजपा नेत्यांनी लावले पोस्टर, देणगी देण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 13:56 IST

Ram Mandir In West Bengal: २०२६ मधील राम नवमीच्या दिवशी पश्चिम बंगालमध्ये राम मंदिर भूमिपूजनाचा संकल्प भाजपा नेत्यांनी घेतल्याचे म्हटले जात आहे.

Ram Mandir In West Bengal: तृणमूल कांग्रेसचे निलंबित आमदार हुमायूं कबीर हे बंगालमध्ये बाबरी मशिदीची उभारणी करण्याची घोषणा करून सध्या चर्चेत आले आहेत. हुमायूं कबीर यांच्या समर्थकांनी विटा घेऊन आगेकूच सुरू केल्याचे फोटोही समोर आले आहेत. यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. यातच आता एका भाजपा नेत्यांनी पश्चिम बंगलामध्ये राम मंदिर बांधले जाणार असल्याचे म्हटले आहे. 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील राजकारण चांगलेच तापू लागले आहे. कोलकाता येथील सॉल्ट लेक परिसरात अनेक ठिकाणी काही पोस्टर्स लावण्यात आले आहेत. यामध्ये अयोध्याप्रमाणे भव्य राम मंदिर संकुल बांधण्याचा दावा करण्यात आला आहे. हे पोस्टर्स स्थानिक भाजपा नेते आणि पक्षाच्या विधाननगर युनिटचे माजी अध्यक्ष संजय पोयरा यांच्या नावाने लावण्यात आले आहेत. राम मंदिराच्या बांधकामासाठी प्रत्येकी एक रुपया देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

राम नवमीच्या दिवशी सकाळी १० वाजता भूमिपूजन

संजय पोयरा यांनी सांगितले की, रामराज्यात राम मंदिर असले पाहिजे. अयोध्येतील राम मंदिरासारखेच विधाननगरमध्येही राम मंदिर बांधले जाईल. अनेक लोकांनी आधीच जमीन, बांधकाम साहित्य आणि मूर्ती दान करण्याची ऑफर दिली आहे. संजय पोयरा यांनी घोषणा केली की, २६ मार्च रोजी रामनवमी दिवशी सकाळी १० वाजता भूमिपूजन आणि पायाभरणी समारंभ होईल. ही एक सामाजिक, अध्यात्मिक चळवळ असेल. राम मंदिराच्या बांधकामासाठी १ रुपये दान करायचे असेल तर आनंदाने स्वीकारली जाईल, असेही पोयरा म्हणाले. 

दरम्यान, बाबरी मशीद पाडण्याचा स्मरण दिन म्हणून निलंबित तृणमूल काँग्रेसचे आमदार हुमायून कबीर यांनी मुर्शिदाबादमधील रेजीनगर येथे बाबरी-मॉडेल मशिदीची पायाभरणी केली. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते संजय पायरा यांच्या नावे लावले गेलेले राम मंदिर बांधण्याबाबतचे पोस्टर लक्ष वेधून घेत आहेत. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Ram Temple to be built in West Bengal: BJP Leader Posters

Web Summary : BJP plans Ram temple in West Bengal amid Babri Masjid controversy. Posters urge donations for Ayodhya-like complex in Kolkata. Groundbreaking scheduled on Ram Navami.
टॅग्स :Ram Mandirराम मंदिरwest bengalपश्चिम बंगालBJPभाजपा