पोलिओ निमरूलन कार्यक्रमात आता लसीसोबत इंजेक्शनही

By Admin | Updated: July 29, 2014 23:40 IST2014-07-29T23:40:51+5:302014-07-29T23:40:51+5:30

भारतातील पोलिओ निर्मूलन कार्यक्रमामध्ये लवकरच शिरेमध्ये दिल्या जाणा:या इंजेक्शनचाही अंतर्भाव केला जाणार असल्याची माहिती केंद्रीय हर्षवर्धन यांनी येथे दिली.

Now injecting vaccines with polio vaccination program | पोलिओ निमरूलन कार्यक्रमात आता लसीसोबत इंजेक्शनही

पोलिओ निमरूलन कार्यक्रमात आता लसीसोबत इंजेक्शनही

नवी दिल्ली : भारतातील पोलिओ निर्मूलन कार्यक्रमामध्ये लवकरच शिरेमध्ये दिल्या जाणा:या इंजेक्शनचाही अंतर्भाव केला जाणार असल्याची माहिती केंद्रीय हर्षवर्धन यांनी येथे दिली. सध्या या कार्यक्रमात मुलांना केवळ तोंडाद्वारे दिल्या जाणा:या औषधाचे चांगले परिणाम दिसून येत असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र या औषधामुळे पोलिओची शक्यता कमी होत असली तरी ती संपत नाही. त्याचे विषाणू पुन्हा कार्यरत होण्याचा धोका संभवतो. त्यासाठी येऊ घातलेल्या इंजेक्शनचा परिणाम हा अधिक चांगला राहील, असा विश्वास त्यांनी  व्यक्त केला. 
राष्ट्रीय अतिसार नियंत्रण पंधरवडय़ाचे उद्घाटन करताना आरोग्यमंत्र्यांनी पुढे असेही सांगितले की, देशातील आठ राज्यांमध्ये व केंद्रशासित प्रदेशात या इंजेक्शनचा वापर सुरू केला असून अन्य राज्यात ऑक्टोबरपासून पुढील वर्षी एप्रिलर्पयत हा कार्यक्रम पूर्ण केला जाईल. यावेळी जागतिक आरोग्य संघटनेच्या भारतातील शाखेचे प्रमुख नाटा मेनाब्दे यांनी, बालमृत्यूच्या समस्येला सामोरे जाताना बहुआयामी प्रयत्नांची गरज असल्याचे ते पुढे म्हणाले.बालमृत्यूचे प्रमाण सर्वात जास्त उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश व राजस्थानात असल्याचे दिसून आले आहे. या अभियानासाठी 29 राज्यांमधील 184 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4प्रतिबंध होऊ शकेल अशा आजाराने पाच वर्षाहून कमी वयाच्या 13 ते 14 लाख मुलांचा मृत्यू भारतात दरवर्षी होत असल्याबद्दल आरोग्यमंत्र्यांनी खेद व्यक्त केला. यातील सुमारे दोन लाखाहून अधिक मुले अतिसाराने मरण पावतात. 

 

Web Title: Now injecting vaccines with polio vaccination program