शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसला पक्ष मुख्यालय रिकामे करण्याबाबत नोटीस

By admin | Updated: February 20, 2015 01:10 IST

नबीन सिन्हा/ नवी दिल्ली

नबीन सिन्हा/ नवी दिल्ली
लोकसभापाठोपाठ अनेक राज्यांतील विधानसभा निवडणुकीत लाजिरवाणा पराभव स्वीकारणाऱ्या काँग्रेसवर राजधानी दिल्लीतील आपले पक्ष मुख्यालय रिकामे करण्याची नामुष्की ओढवण्याची शक्यता आहे़ केंद्र सरकारने काँग्रेसला पक्ष मुख्यालय रिकामे करण्यासाठी नोटीस बजावली आहे़ रायसीना मार्गावरील जवाहरलाल भवन तसेच राजीव गांधी ट्रस्टचे कार्यालय रिकामे करण्याचेही नगर विकास मंत्रालयाने बजावलेल्या या नोटीसमध्ये म्हटले आहे़ ही सर्व कार्यालये काँग्रेसला लीजवर दिलेली होती आणि ही लीज २०१३ मध्ये संपल्याचे सांगण्यात येत आहे़
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जनार्दन द्विवेदी, मोतीलाल व्होरा, नवीन जिंदल आदींनी या मुद्यावर चर्चा केली आणि नगर विकास मंत्रालयाकडून आणखी काही काळ मुदत मागण्याचा निर्णय घेतला आहे़ या काळात कायदेशीर उपाययोजनांची शक्यता काँग्रेस तपासणार आहे़
पक्ष मुख्यालयासोबतच काँग्रेसच्या ताब्यात असलेली अन्य काही महत्त्वपूर्ण कार्यालयेही रिकामी करण्याचे नोटीसमध्ये बजावण्यात आले आहे़ २४, अकबर रोड हे काँग्रेसचे मुख्यालय आहे़ याच ठिकाणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे कार्यालय आहे़ २६, अकबर रोड हे काँग्रेस सेवादलाचे कार्यालय आहे़ ६, रायसीना रोडस्थित युवा काँग्रेसचे कार्यालय आहे तर ५, रायसीना हे राजीव गांधी ट्रस्टचे जवाहरलाल भवन कार्यालय म्हणून ओळखले जाते़ चाणक्यपुरीमधील सध्या काँग्रेसच्या ताब्यात असलेला एक बंगला रिकामा करण्याबाबतही नोटीस बजावण्यात आली आहे़
काँग्रेसच्या एका नेत्याने दिलेल्या माहितीनुसार,निवडणुकीत पराभवानंतर राजकीय इतिहासात प्रथमच काँग्रेसला अशा प्रकारची नोटीस मिळाली आहे़२४ आणि २६ अकबर मार्गावरील काँग्रेसच्या ताब्यातील कार्यालयाबाहेर करण्यात आलेले अवैध आणि अतिरिक्त बांधकाम त्वरित हटविण्याचे निर्देशही नोटीसमध्ये देण्यात आले आहे़