शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
2
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
5
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
6
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
7
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
8
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
9
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
10
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
11
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
12
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
13
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
14
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
15
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
16
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
17
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
19
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
20
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

गडकरींच्या दिल्लीतील कारचे पुणे, नागपूर, चंद्रपूर येथून निघाले ‘पीयूसी’ प्रमाणपत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 06:19 IST

वाहनाची तपासणी करून प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र घेतल्यानंतरच वाहन रस्त्यावर आणता येते.

- विकास झाडे नवी दिल्ली : वाहनाची तपासणी करून प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र घेतल्यानंतरच वाहन रस्त्यावर आणता येते. अन्यथा १० हजार रुपये दंड व सहा महिन्यांपर्यंत शिक्षा भोगावी लागते, परंतु केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्या दिल्लीतील कारचे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र पुणे, नागपूर व चंद्रपूर येथून उपलब्ध झाल्याने पीयूसी यंत्रणेचा भ्रष्टाचार उघड झाला आहे.‘लोकमत’ने पुणे, नागपूर व चंद्रपूर येथील पाच सामान्य नागरिकांना एमएच४९एई२७०० या वाहनाचा नंबर पाठवून त्याचे पीयूसी प्रमाणपत्र मागविले. पुण्यातून तीन प्रमाणपत्रे देण्यात आली. एक भोसरीतील साई पीयूसी सेंटरमधून आणि अन्य दोन जंगली महाराज रोडवरील कलमाडी पेट्रोल पंपातून मिळाली. तिथे तर पुढच्या वर्षीचेही पीयूसी देण्यात आले. गडकरींच्या नागपूरमधून आरटीओ परिसरातून पाच मिनिटांत पीयूसी मिळाले. चंद्रपूरमधून दोन वेगवेगळ्या सेंटरहून प्रमाणपत्र तातडीने मिळाले. एकानेही गाडी कुठे आहे? हा प्रश्न केला नाही आणि गाडी तपासण्याची त्यांना गरजही वाटली नाही.

>ज्या कारचे प्रमाणपत्र देण्यात आले, ती कार नितीन गडकरी यांच्या नावावर असून तीन वर्षांपासून दिल्लीत आहे. गडकरी स्वत: ही कार वापरतात. कायद्याची अंमलबजावणी करताना, त्यातील भ्रष्ट यंत्रणांना चाप बसवणे गरजेचे झाले आहे.>१00 रुपयांत प्रमाणपत्रवाहन प्रदूषण करीत असल्यास २४ तासांत सर्व्हिसिंग करून प्रदूषण नियंत्रणात आणावे लागते. त्यानंतरच प्रमाणपत्र मिळते.वाहनाच्या मॉडेलनुसार ३, ६ व १२ महिन्यांसाठी प्रमाणपत्र दिले जाते. कोणत्याही राज्याने दिलेले पीयूसी देशभर चालते.पीयूसीमध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे. महाराष्टÑात वाहन तपासणीसाठी न नेताही पीयूसी प्रमाणपत्र सर्रास १०० रुपयांमध्ये दिले जाते.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी