शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आधी कोणी हल्ला केला? विंग कमांडर हल्ल्या प्रकरणात नवा ट्विस्ट, CCTV मध्ये अधिकाऱ्याचे कृत्य उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 22:17 IST

बंगळुरुमध्ये विंग कमांडर मारहाण प्रकरणामध्ये वेगळं वळण लागले आहे.

Bengaluru IAF Wing Commander Road Rage Case: भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर शिलादित्य बोस आणि त्यांच्या पत्नी स्क्वॉड्रन लीडर मधुमिता दास यांच्यावर कथित हल्ला प्रकरणाला वेगळे वळण लागलं आहे. रविवारी संध्याकाळी एका दुचाकीस्वाराने अचानक त्यांच्यावर हल्ला केल्याचा दावा विंग कमांडर शिलादित्य बोस यांनी केला. दोन्ही अधिकारी त्यांच्या खाजगी कारमधून रमण नगर येथील डीआरडीओ कॉलनीतून विमानतळाकडे जात असताना ही घटना घडली. मात्र आता समोर आलेल्या सीसीटीव्हीमधून वेगळा प्रकार समोर आला आहे.

भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर आदित्य बोस आणि त्यांची पत्नी स्क्वॉड्रन लीडर मधुमिता यांच्यावर बंगळुरूमध्ये हल्ला झाला. सध्या या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली. या हल्ल्यात विंग कमांडर बोस यांच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर गंभीर दुखापत झाली. त्यांनी स्वतः त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एका व्हिडिओद्वारे घटनेची माहिती दिली. एका दुचाकीस्वाराने त्याच्या गाडीचा पाठलाग सुरू केला आणि कन्नड भाषेत शिवीगाळ करत त्याने त्याची गाडी ओव्हरटेक करुन पुढे थांबवली आणि शिवीगाळ सुरु केली.

त्यानंतर जेव्हा बोस जेव्हा गाडीतून बाहेर आले तेव्हा त्या व्यक्तीने त्यांच्या कपाळावर चावीने वार केले. दुचाकीस्वाराने त्यांच्या गाडीवर दगडही फेकला, ज्यामुळे त्यांच्या डोक्याला पुन्हा दुखापत झाली. मदतीसाठी आजूबाजूला पाहत असताना, जवळ उभे असलेले लोक मला आणि माझ्या पत्नीला शिवीगाळ करू लागले. व्हिडिओची दखल घेत, पोलिसांनी गुन्हा दाखल करुन विकास या दुचाकीस्वाराला अटक केली.

त्यानंतर आता बोस यांच्यासोबत झालेल्या वादाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये कमांडरनेच तरुणावर हल्ला केल्याचे समोर आलं आहे. सीसीटीव्ही फुटेजनुसार, दोघांमध्ये भाषेवरून वाद झाला. यानंतर, दोघेही एकमेकांशी भांडले, त्यानंतर विंग कमांडर बोसने त्या तरुणाला जमिनीवर आपटलं आणि त्याला पायाने लाथ मारली. त्यानंतर आदित्य बोसने तरुणाला लाथा बुक्क्यांनी मारहाण सुरुच ठेवली. हे सीसीटीव्ही फुटेज आता व्हायरल होत असू लोकांकडून योग्य कारवाईची मागणी केली जात आहे.

टॅग्स :BengaluruबेंगळूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसindian air forceभारतीय हवाई दल