शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटक, केरळ, तामिळनाडू नवे हॉटस्पॉट, महाराष्ट्र, दिल्ली पिछाडीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2021 05:18 IST

केंद्र सरकार चिंताग्रस्त; महाराष्ट्र, दिल्ली पिछाडीला

हरीश गुप्ता

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रमधील कोरोना रुग्णांची संख्या काही प्रमाणात स्थिरावली व दिल्लीतील रुग्णसंख्या घटली आहे. मात्र कर्नाटक, केरळ, तामिळनाडू हे आता कोरोनाचे नवे हॉटस्पॉट बनत आहेत. त्याची चिंता आता केंद्र सरकारला सतावू लागली आहे. या तीन राज्यांत गेल्या ६ दिवसांत रुग्णसंख्या २० टक्क्यांनी वाढली आहे.

महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक रुग्ण आहेतच पण त्यानंतर कर्नाटकने दुसरा क्रमांक मिळविला आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या राज्यांच्या क्रमवारीत केरळ तिसऱ्या व तामिळनाडू पाचव्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेशमध्ये रुग्णांच्या संख्येत घट होत आहे तर दक्षिण भारतात आंध्र प्रदेशसहित चार राज्यांमध्ये सहा दिवसांत रुग्णसंख्या वाढत आहे. 

वाढता वाढता वाढे...n    कर्नाटकमध्ये कोरोना रुग्णसंख्या १ मे रोजी ४०,९९० होती. ती ६ मे रोजी ४,९०,०५८ वर पोहोचली. ही रुग्णवाढ २१ टक्के होती. या राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण २९ टक्के असून ते देशात सर्वाधिक आहे. तरीही तिथे ही परिस्थिती ओढवली आहे. n    केरळमध्ये कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण २० टक्के आहे. कोरोनाशी यशस्वी मुकाबला करणाऱ्या राज्यांमध्ये केरळ आघाडीवर होते. तिथे लसीकरण व कोरोना चाचण्यांचे प्रमाण देशात सर्वाधिक होते. पण आता केरळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. n    महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण गेल्या दोन दिवसांत १३ टक्क्यांपर्यंत खाली घसरले आहे.

देशात कोरोनाचे ४ लाख १४ हजार नवे रुग्ण

n    देशात शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या  २४ तासांत कोरोनाचे नवे चार लाख १४ हजार १८८ रुग्ण नोंद झाले, तर ३,९१५ जणांचा मृत्यू झाला.n    या रुग्णसंख्येमुळे एकूण रुग्णांची संख्या दोन कोटी १४ लाख ९१ हजार ५९८ झाली. उपचाराधीन रुग्णांची संख्या ३६ लाख ४५ हजार १६४ झाली  आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले. 

n    उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण रुग्णसंख्येत १६.९६ टक्के आहे, तर रुग्ण बरे होण्याचा दर देशाचा ८१.९५ टक्क्यांवर आला. एक कोटी ७६ लाख १२ हजार ३५१ रुग्ण बरे झाले, तर मृत्यूचा दर एकूण रुग्णसंख्येत १.०९ टक्के आहे.

दिल्लीत रुग्ण बरे होण्याचे कमी प्रमाणn    दिल्लीमध्ये कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अवघे ७ टक्के असून कोरोनाचा नवीन विषाणू अधिक घातक आहे. उत्तर प्रदेशमध्येही कोरोना चाचण्या व लसीकरण करण्याचा वेग धीमा आहे. तामिळनाडूमध्येही कोरोना रुग्णसंख्येत १ मे ते ६ मे या कालावधीत २०.८ टक्के वाढ झाली आहे. n    महाराष्ट्रात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण गेल्या दोन दिवसांत १३ टक्क्यांपर्यंत खाली घसरले आहे. 

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKarnatakकर्नाटक