शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
हरभजन सिंगविरोधात समर्थकांचा रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
4
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
7
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
8
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
9
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
10
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
11
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
12
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
13
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
14
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
15
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
16
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
17
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
18
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
19
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
20
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
Daily Top 2Weekly Top 5

‘डेल्टा प्लस’चे नवे संकट, सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात; सावध राहण्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2021 06:51 IST

मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी मंगळवारी सांगितले की, उर्वरित सहा रुग्ण केरळ आणि मध्यप्रदेशात आहेत.

- नितीन अग्रवालनवी दिल्ली : कोरोनाच्या ‘डेल्टा व्हेरिएंट’ने भारतात बरीच हानी केली आता डेल्टा प्लस व्हेरिएंट चिंतेचे कारण बनला आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी म्हटले. भारतासह जगात नऊ देशांत सापडलेल्या या व्हेरिएंटचे देशात २२ रुग्ण समोर आले असून त्यात जळगाव आणि रत्नागिरीत १६ सापडले आहेत.

मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी मंगळवारी सांगितले की, उर्वरित सहा रुग्ण केरळ आणि मध्यप्रदेशात आहेत. या राज्यांना सावध राहून त्याला कसे तोंड द्यायचे हे सांगण्यात आले आहे. ज्या देशांत डेल्टा प्लस व्हेरियंटचे संक्रमण मिळाले त्यात इंग्लड, अमेरिका, जपान, रशिया, भारत, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड, नेपाळ आणि चीनचा समावेश आहे. डॉ. पॉल म्हणाले की, ज्या ज्येष्ठांनी लस घेतली आहे व ज्यांना आरोग्याची कोणतीही गंभीर समस्या नाही ते पूर्ण काळजी घेऊन थोडा वेळ बाहेर फिरू शकतात. त्यांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. 

सध्या शाळा उघडणार नाहीत

शाळा उघडण्याबद्दल डॉ. पॉल म्हणाले की, शाळा सुरू करण्यात जोखीम आहे. शाळेत विद्यार्थी, शिक्षक  आणि कर्मचारी सगळे एका जागी असतात म्हणून संक्रमणाला वाव मिळतो. 

 तिसरी लाट अडवता येईल

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबद्दल नीति आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल म्हणाले की, बेजबाबदार वर्तन केल्यास ती येण्याची जास्त शक्यता आहे. लसीसोबत नियम व पथ्ये पाळली तर ती टाळता येईल. जर विषाणू जास्त संक्रमित होतोय किंवा त्याने स्वरूप बदलल्यासही धोका वाढू शकतो. परंतु, सध्या त्याबद्दल भाकित करता येणार नाही. ते म्हणाले, अनेक देशांत तिसरी, चौथी लाटही आली. परंतु, अनेक देशांत दुसरीही आली नाही.

राज्यांनी काय करावे?

ज्या जिल्ह्यांमध्ये डेल्टा प्लस या नव्या कोरोना विषाणूचे रुग्ण आढळले आहेत, तिथे प्रतिबंधात्मक उपाय करावेत. चाचण्या वाढवाव्यात. लसीकरणही वाढवावे आणि तेथील विषाणूचे नमुने चाचणीसाठी पाठवावे, असे केंद्रीय आरोग्य खात्याने म्हटले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्र