झेलियांग नागालँडचे नवे मुख्यमंत्री

By Admin | Updated: May 25, 2014 04:01 IST2014-05-25T04:01:34+5:302014-05-25T04:01:34+5:30

नागा पीपल्स फ्रंट (एनपीएफ)चे नेते टी.आर. झेलियाँग यांनी शनिवारी नागालँडचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केली

New Chief Minister of Jheliang Nagaland | झेलियांग नागालँडचे नवे मुख्यमंत्री

झेलियांग नागालँडचे नवे मुख्यमंत्री

कोहिमा : नागा पीपल्स फ्रंट (एनपीएफ)चे नेते टी.आर. झेलियाँग यांनी शनिवारी नागालँडचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केली. लोकसभेवर निवडून आलेले नीफियो रियो यांनी राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या जागी झेलियाँग यांची मुख्यमंत्रिपदी निवड करण्यात आली होती. राज्यपाल अश्विनीकुमार यांनी ६२ वर्षीय झेलियाँग यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. त्यांच्यासोबत त्यांच्या ११ मंत्र्यांचाही शपथविधी यावेळी पार पडला. झेलियाँग यांनी जुन्या पाच मंत्र्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले आहे. तर सहा मंत्री नवे आहेत. रियो यांनी ११ वर्षेपर्यंत मुख्यमंत्रिपदी राहिल्यानंतर श्ुक्रवारी राजीनामा दिला होता. (वृत्तसंस्था)

Web Title: New Chief Minister of Jheliang Nagaland