शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पहलाज निहलानी सेन्सॉरचे नवे अध्यक्ष

By admin | Updated: January 20, 2015 01:24 IST

सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदावर सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते पहलाज निहलानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे़

नवी दिल्ली : सरकारच्या धोरणावर आगपाखड करीत लीला सॅमसन यांनी सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदावर सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते पहलाज निहलानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ सरकारने बोर्डाचे पुनर्गठन करीत अन्य नऊ सदस्यांचीही नियुक्ती केली़डेरा सच्चाचे प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘मेसेंजर आॅफ गॉड’ या वादग्रस्त चित्रपटाला चित्रपट प्रमाणीकरण अ‍ॅपिलेट लवादाने (एफसीएटी) मंजुरी दिल्यानंतर लीला सॅमसन यांनी तडकाफडकी राजीनाम्याचा निर्णय घेतला होता़ बोर्डाने मनाई केली असतानाही एफसीएटीने प्रदर्शनाला मंजुरी दिल्याने त्या नाराज झाल्या होत्या़ त्यांच्या समर्थनार्थ बोर्डाच्या अनेक सदस्यांनीही राजीनामे दिले होते़माहिती व प्रसारण मंत्रालयाने आज सोमवारी एका अधिकृत पत्रकाद्वारे निहलानी यांच्या नियुक्तीची माहिती दिली आहे़ केंद्र सरकारने पहलाज निहलानी यांना सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष नियुक्त केले आहे़ ते तीन वर्षे वा पुढील आदेशापर्यंत (जे आधी असेल) या पदावर राहतील, असे यात म्हटले आहे़ सरकारने बोर्डाचे नऊ सदस्यही नियुक्त केले आहेत़ या नऊ सदस्यांमध्ये भाजपा नेत्या वाणी त्रिपाठी टिक्कू, चित्रपट निर्माते अशोक पंडित, चंद्रप्रकाश द्विवेदी यांचा समावेश आहे़ अन्य सदस्यांमध्ये पटकथा लेखक मिहिर भुटा, सय्यद अब्दुल बारी, रमेश पतंगे, कलाकार जॉर्ज बेकर, अभिनेता आणि चित्रपट निर्माता जिविता आणि अभिनेता एस़ व्ही़ शेखर यांचा समावेश आहे़हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक-निर्माता म्हणून पहलाज निहलानी ओळखले जातात. ९० च्या दशकात त्यांनी गोविंदाबरोबर ‘आँखे’, ‘शोला और शबनम’ अशा अनेक लोकप्रिय चित्रपटांची निर्मिती केली. इंडस्ट्रीत चित्रपट निर्मात्यांशी संबंधित गिल्ड आणि इंपा या संस्थांचेही त्यांनी नेतृत्व केले होते. चित्रपटसृष्टीशी निगडीत समस्यांवर नेहमीच आवाज उठवून सरकारी स्तरावर त्याचा पाठपुरावा करण्यासाठी नेहमीच ते तत्पर असल्याचे इंडस्ट्रीत मानले जाते. तसेच गेल्या दोन दशकांपासून खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. पहलाज निहलानी हे सुप्रसिद्ध दिग्दर्शक गोविंद निहलानी यांचे बधू आहेत़च्चित्रपटसृष्टीशी निगडीत व्यक्तीला अध्यक्षपद मिळण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. लीला सॅमसन यांच्या आधी शर्मिला टागोर, आशा पारेख, अनुपम खेर, विजय आनंद यांनीही अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. च्सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदाची धुरा ही गैरफिल्मी व्यक्तींना देण्यापेक्षा चित्रपटसृष्टीतल्याच ज्येष्ठ लोकांना दिली जावी, अशी अनेकांची पूर्वीपासून मागणी होती. या आठवड्यात निहलानी आपला पदभार स्वीकारतील, असे सूत्रांनी सांगितले.