नवीन पिढीत जनजागृतीची गरज

By Admin | Updated: December 18, 2014 00:40 IST2014-12-18T00:40:40+5:302014-12-18T00:40:40+5:30

फोटो ओळी ....राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आयोजित स्वाभिमान सप्ताह कार्यक्र मात मार्गदर्शन करताना जयंत पाटील.

The need of the new generation is to raise awareness | नवीन पिढीत जनजागृतीची गरज

नवीन पिढीत जनजागृतीची गरज

टो ओळी ....राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आयोजित स्वाभिमान सप्ताह कार्यक्र मात मार्गदर्शन करताना जयंत पाटील.
जयंत पाटील यांचे प्रतिपादन : राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वाभिमान सप्ताह
नागपूर : पर्यावरण संवर्धनासाठी ग्रामविकास, जलसंधारण व पर्यावरण याविषयी नवीन पिढीत जनजागृती करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्वाभिमान सप्ताह कार्यक्र मात ते बोलत होते. शहर पक्षाचे अध्यक्ष अजय पाटील अध्यक्षस्थानी तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आ. दीनानाथ पडोळे उपस्थित होते.
गेल्या शतकात पर्यावरणाची अतोनात हानी झाली आहे. यातून दुष्काळ व अवकाळी पाऊ स, गारपीट अशी नैसर्गिक संकटे वाढली आहेत. पवार हे देशाचे कृषिमंत्री असताना जलसंधारणासाठी त्यांनी प्रभावी योजना राबविल्या. ग्रामविकास व पर्यावरण यांची सांगड घालण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर त्यांनी विविध योजना राबविल्याचे त्यांनी सागितले. शाळा-महाविद्यालयात पर्यावरण हा विषय असावा, असे अजय पाटील म्हणाले. सुभाष टाले यांनीही मार्गदर्शन केले.
दुसऱ्या सत्रात राम गावंडे यांनी ग्रामविकासावर मार्गदर्शन केले. वनराई संस्थेने दत्तक घेतलेल्या मानेगाव येथे लोकसहभागातून कोलार नदी पात्रात २२० फुटाचा बंधारा बांधल्याची माहिती त्यांनी दिली. तिसऱ्या सत्रात उपवनरक्षक दावलवार यांनी पर्यावरण संवर्धनाची माहिती दिली. यावेळी राजेश कुंभलकर, महेंद्र भांगे, महादेवराव फुके, तनुज चौबे, प्रगती पाटील, पराग नागपुरे, योगेश मेश्राम, शरद नागदिवे, हरविंदरसिंग मुल्ला, बबीता मेहेर, प्रतिभा वासनिक, नितीन गेडाम, सुरेंद्र रामटेके, दिनकर वानखेडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन नितीन जतकर यांनी तर आभार नगरसेवक राजू नागुलवार यांनी मानले.(प्रतिनिधी)

Web Title: The need of the new generation is to raise awareness